विराटने सोडले कर्णधारपद, डिव्हिलियर्सने घेतला संन्यास; आता RCBची कमान कोणाच्या हाती जाणार पाहा... - क्रिकेट प्रेमी

विराटने सोडले कर्णधारपद, डिव्हिलियर्सने घेतला संन्यास; आता RCBची कमान कोणाच्या हाती जाणार पाहा...

पुणे : विराट कोहलीने आयपीएल २०२१ (IPL 2021) च्या उत्तरार्धात सांगितले होते की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी कर्णधार म्हणून त्याचा हा शेवटचा हंगाम आहे. याचा अर्थ विराट पुढील वर्षी म्हणजे आयपीएल २०२२ मध्ये आरसीबी संघाचे नेतृत्व करणार नाही. कोहलीनंतर त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सचे नाव पुढे येत होते, पण डिव्हिलियर्सने शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. दोन जुने सहकारी कर्णधारपदाच्या शर्यतीतून बाहेर गेल्याने आता आरसीबी पुढील आयपीएल कोणाच्या नेतृत्वाखाली खेळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्लेन मॅक्सवेल - कर्णधारपदाच्या शर्यतीत आता ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलचे नाव आघाडीवर आहे. या मोसमात मॅक्सवेल आरसीबीमध्ये आला आणि त्याने उत्कृष्ट खेळी खेळली. विराट आणि डिव्हिलियर्सनंतर तो संघाचा सर्वात महत्त्वाचा फलंदाज होता. डिव्हिलियर्सच्या जाण्यानंतर आरसीबीला त्याला कायम ठेवायला आवडेल आणि जर तो कर्णधार झाला, तर नवल नाही. के.एल. राहुल - आयपीएल-२०२१ मध्ये पंजाब किंग्जचा कर्णधार असलेल्या के.एल. राहुलबद्दल बातम्या येत होत्या की, तो पंजाब सोडू शकतो. असे झाल्यास आरसीबी पुढील हंगामासाठी मेगा लिलावात त्याच्यावर बोली लावू शकते आणि त्याला कर्णधार बनवू शकते. राहुल आरसीबीमधूनच पंजाबमध्ये गेला आहे. डेव्हिड वॉर्नर - २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबादला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या डेव्हिड वॉर्नरवर आरसीबीचे डोळे लागले आहेत. हैदराबादने वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतर त्याला अंतिम-११ मध्येही त्याला संधी दिली नाही. आगामी मेगा लिलावासाठी आपण उपलब्ध असल्याचे वॉर्नरने स्पष्ट केले होते. वॉर्नर प्रभावी कर्णधार आणि फलंदाज असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आरसीबी त्याला सोबत घेऊ शकते. अॅरॉन फिंच - नुकताच ऑस्ट्रेलियाला पहिला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार अॅरॉन फिंचही आरसीबीच्या रडारवर असू शकतो. तो आयपीएल २०२० मध्ये आरसीबीकडून खेळला आहे, पण २०२१ मध्ये त्याला खरेदीदार मिळाला नाही. त्यामुळे आता कर्णधारपदासाठी फिंचदेखील एक पर्याय आरसीबीकडे असू शकतो.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3Dzo4S0
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads