RCBने २०२२च्या हंगामासाठी घेतला मोठा निर्णय, या भारतीय खेळाडूची केली नियुक्ती - क्रिकेट प्रेमी

RCBने २०२२च्या हंगामासाठी घेतला मोठा निर्णय, या भारतीय खेळाडूची केली नियुक्ती

बेंगळुरू: आयपीएलच्या १५व्या हंगामाची तयारी बीसीसीआयकडून सुरू झाली आहे. २०२२ साली होणाऱ्या हंगामात दोन नव्या संघाचा समावेश झाला आहे. यामुळे स्पर्धेतील संघांची संख्या ८ वरून १० वर पोहोचली आहे. आयपीएलमध्ये गेल्या हंगामापर्यंत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने एक मोठा निर्णय घेतला आहे. वाचा- आयपीएलच्या पुढील हंगामापासून आरसीबी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बांगर यांना फ्रेब्रुवारी महिन्यात फलंदाजीचा सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. आता त्यांची नियुक्ती मुख्य प्रशिक्षक म्हणून करण्यात आली आहे. बांगर माइक हेसन यांची जागा घेतील. हेसन यांच्याकडे क्रिकेट संचालक निर्देशक अशी जबाबदारी देण्यात आली आहे. वाचा- ऑस्ट्रेलियाचे सायमन कॅटीच यांनी वैयक्तीक कारणामुळे आरसीबीच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आयपीएल २०२१च्या दुसऱ्या सत्रात हेसन यांच्याकडे मुख्य प्रशिक्षक पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. आरसीबीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हेसन यांनी सांगितले की, संजय बांगर पुढील दोन वर्षासाठी आरसीबीचे मुख्य कोच असतील. बांगर हे फलंदाजीचे कोच म्हणून ओळखले जातात. पण त्याची क्षमता त्या पेक्षा अधिक आहे. त्याच्याकडे प्रशिक्षणाचा मोठा अनुभव आहे. ते २०१४ ते २०१९ पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजीचे कोच होते. वाचा- वाचा- ... मी संघातील खुप चांगल्या खेळाडूंसोबत काम केले आहे. संघाला पुढील स्तरावर घेऊन जाण्यासाठी आता आणखी वाट पाहावी लागणार नाही, असे बांगर यांनी नियुक्ती झाल्यानंतर सांगितले. बांगर यांनी २००१ ते २०४ या काळात भारताकडून १२ कसोटी आणि १५ वनडे सामने खेळले आहेत.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3bVVDS4
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads