या देशात होणार IPLचा १५वा हंगाम; जय शहांनी मोठा खुलासा - क्रिकेट प्रेमी

या देशात होणार IPLचा १५वा हंगाम; जय शहांनी मोठा खुलासा

चेन्नई : २०२२ साली होणारा आयपीएलचा १५व्या हंगामाची सर्वांना उत्सुकता आहे. मध्ये संघांची संख्या ८ वरून १० इतकी होणार आहे. २०२० मध्ये करोनामुळे ही स्पर्धा युएईत झाली त्यानंतर २०२१मध्ये देखील अर्धी स्पर्धा युएईमध्ये खेळवावी लागली होती. आता या वर्षी स्पर्धा कुठे होणार आणि मेगा ऑक्शन कुठे होणार याचे अपडेट बीसीसीआयचे सचिव यांनी दिले आहेत. वाचा- आयपीएलचा १५वा हंगाम भारतात होणार आहे. तसेच यासाठी मेगा लिलाव लवकरच होणार असल्याची माहिती जय शहा यांनी शनिवारी दिली. चेन्नई सुपर किंग्जच्या एका कार्यक्रमात तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन आणि अन्य दिग्गज लोकांच्या उपस्थितीत जय शहा यांनी बीसीसीआयच्या योजनेबद्दल सांगितले. या कार्यक्रमात भारताचे माजी कर्णधार कपिल देव, महेंद्र सिंह धोनी, सीएसकेचे चेअरमन एन श्रीनिवासन आणि अन्य खेळाडू उपस्थित होते. वाचा- जय शहा यांनी यावेळी टी-२० वर्ल्डकपमध्ये धोनीने मेंटॉर म्हणून पार पाडलेल्या भूमिकेचे कौतुक केले. मी धोनीला सांगितले होते की भारताला तुझी गरज आहे. तेव्हा त्याने एकही रुपया न घेता हे काम करणार असल्याचे सांगितले. वाचा- आयपीएलच्या पुढील हंगामात अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नव्या संघांचा समावेश होणार आहे. यामुळे संघांची संख्या ८ वरून १० इतकी होईल. आयपीएलची नवी रिटेशन पॉलिसीनुसार जुन्या संघाला चार खेळाडू रिटेन करता येतील. पण नव्या संघांसाठी या नियमात सवलत दिली जाणार आहे. आयपीएलच्या मेगा लिलावासाठी थोडी वाट पाहावी लागले असे शहा यांनी सांगितले. वाचा- या कार्यक्रमात बोलताना धोनी म्हणाला, मी नेहमी क्रिकेटसाठी माझी योजना तयार केली आहे. अखेरची मॅच खेळली होती ती रांचीत खेळली. मी अखेरची वनडे देशांतर्क क्रिकेटमध्ये रांचीत खेळील होती. आता मला आशा आहे की माझी अखेरची टी-२० मॅच चेन्नईत होईल. ती गोष्ट पुढील वर्षी होईल की पाच वर्षात हे मी नाही सांगू शकत.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3DDf2U6
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads