IPLमधून दरवर्षी हजारो कोटी कमावते BCCI; पण का भरत नाही एकाही रुपयाचा टॅक्स, जाणून घ्या... - क्रिकेट प्रेमी

IPLमधून दरवर्षी हजारो कोटी कमावते BCCI; पण का भरत नाही एकाही रुपयाचा टॅक्स, जाणून घ्या...

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या बीसीसीआयला कर विभागाविरुद्ध मोठा विजय मिळाला आहे. आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने (आयटीएटी) बीसीसीआयला मोठा दिलासा देताना म्हटले आहे की, आयपीएल स्पर्धेतील कमाईवर कर जमा करावा लागणार नाही. याबाबत आयटीएटीने पुढे म्हटले आहे की, बीसीसीआय दरवर्षी आयपीएलमधून करोडोंची कमाई करते यात शंका नाही, पण जगभरातील क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आहे, हे नाकारता येणार नाही. त्यामुळे त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकारता येत नाही. महसूल विभागाने २०१६-१७ या आर्थिक वर्षात बीसीसीआयला तीन कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. या नोटीसमध्ये महसूल विभागाने क्रिकेट प्रशासकीय मंडळाला विचारले होते की, आयकर कायद्याच्या कलम १२-ए अंतर्गत कोणत्या आधारावर कर सवलत मिळत आहे. याविरोधात बीसीसीआयने मुंबई आयटीएटी खंडपीठाकडे धाव घेतली होती. याच अपीलवर आयटीएटीने निकाल दिला आहे. आयपीएल हा प्रचारात्मक कार्यक्रम हा निकाल देताना अपीलेट ट्रिब्युनलने सांगितले की, बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेची रचना अशा प्रकारे केली आहे, ज्यामुळे या स्पर्धेची लोकप्रियता खूप जास्त आहे. त्याच्या लोकप्रियतेमुळे येथे प्रायोजकत्वाचा पूर येत असून करोडोंची कमाई झाली आहे. ही स्पर्धा क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आहे, हे नाकारता येणार नाही. कर विभाग म्हणते मनोरंजन उपक्रम दुसरीकडे, आयपीएल ही मनोरंजनाची स्पर्धा असल्याचे कर विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे या स्पर्धेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागतो. आयपीएलमधील होणाऱ्या अॅक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले, तर ही स्पर्धा व्यापार, वाणिज्य आणि व्यवसायाशी संबंधित आहे. पब्लिक ट्रस्टवर काय परिणाम होणार? आयटीएटीच्या या निर्णयाचा पब्लिक ट्रस्टच्या अॅक्टिव्हिटीवर गंभीर परिणाम होणार आहे. आता पब्लिक ट्रस्टदेखील हा मार्ग अवलंबण्याची शक्यता आहे, असे कर तज्ज्ञांचे म्हणणे आहे, पण हे खाजगी ट्रस्टसाठी लागू होणार नाही. आयकर कायद्याच्या कलम १२-अ नुसार, पब्लिक ट्रस्टला त्यांच्या अॅक्टिव्हिटीबद्दलची माहिती मुख्य आयोगाला द्यावी लागते.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3ndbMcc
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads