IPL 2022 : आयपीएलच्या पुढच्या हंगामात होणार मोठे बदल; धोनी, राहुल, रैना याचं काय होणार, जाणून घ्या... - क्रिकेट प्रेमी

IPL 2022 : आयपीएलच्या पुढच्या हंगामात होणार मोठे बदल; धोनी, राहुल, रैना याचं काय होणार, जाणून घ्या...

: चेन्नई : आयपीएल २०२२चा लिलाव आणि रिटेन्शन (खेळाडू कायम ठेवण्याबद्दल)ची चर्चा जोर धरू लागली आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, महेंद्रसिंह धोनीला चेन्नई सुपर किंग्ज () फ्रँचायझी पुढील तीन हंगामांसाठी कायम ठेवणार आहे. याशिवाय सुरेश रैना पहिल्यांदाच फ्रँचायझी सोडू शकतो. त्याचबरोबर पंजाब किंग्जचा माजी कर्णधार आणि खेळाडू के.एल. राहुलही नव्या संघात दिसू शकतो. चेन्नईचा संघ धोनीशिवाय रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड यांना कायम ठेवणार आहे. या दोन्ही खेळाडूंनी २०२१ मध्ये सीएसकेला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. बीसीसीआयने बनवलेल्या नियमांनुसार एक संघ जास्तीत जास्त चार खेळाडूंनाच कायम ठेवू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, सीएसके मोईन अलीच्या नावाची चर्चा करत आहे. जर मोईन अलीला संघात राहायचे नसेल, तर त्याचा देशबांधव खेळाडू इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनलाही चेन्नई संघात कायम ठेवेल. दुसरीकडे, सीएसके पहिल्यांदाच सुरेश रैनाची साथ सोडू शकते. आयपीएल २०२१ च्या बाद फेरीतही त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. सर्व फ्रँचायझींना कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी ३० नोव्हेंबरपर्यंत बोर्डाकडे पाठवावी लागणार आहे. आयपीएल २०२२ साठी मेगा लिलाव पुढील महिन्यात होणार आहे. या वेळी संजीव गोएंका यांच्या आरपीएसजी (RPSG) ग्रुपचे लखनऊ आणि सीव्हीसी कॅपिटल्सचा अहमदाबाद हे दोन नवे संघ लिलावात सहभागी होणार आहेत. या संघांनीही भारतीय खेळाडूंशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, के.एल. राहुलला लखनऊच्या संघाचा कर्णधार बनवले जाऊ शकते. राहुलने ही ऑफर स्वीकारल्याचेही बोलले जात आहे. तसेच सूर्यकुमार यादवलाही नवीन फ्रँचायझीने ऑफर दिली आहे, पण त्याने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पंतच दिल्लीचा कर्णधार दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने रिषभ पंतला कर्णधारपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संघाने श्रेयस अय्यर, रविचंद्रन अश्विन यांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पंत व्यतिरिक्त दिल्लीने अक्षर पटेल, पृथ्वी शॉ आणि एन्रिक नोर्किया यांनाही कायम ठेवले आहे. कोण कोण होणार रिटेन? चेन्नई सुपर किंग्ज : एम.एस. धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली/सॅम करन. दिल्ली कॅपिटल्स : रिषभ पंत, पृथ्वी शॉ, एन्रिक नोर्किया, अक्षर पटेल. मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, किरॉन पोलार्ड (चर्चा सुरू आहे), ईशान किशन कोलकाता नाईट रायडर्स : सुनील नरेन, आंद्रे रसेल


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3cNzqGo
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads