भारतीय क्रिकेटपटूला पुढील आदेश मिळेपर्यंत UAE न सोडण्याचे आदेश; जाणून घ्या कारण - क्रिकेट प्रेमी

भारतीय क्रिकेटपटूला पुढील आदेश मिळेपर्यंत UAE न सोडण्याचे आदेश; जाणून घ्या कारण

नवी दिल्ली: आयपीएलचा १४वा हंगाम अखेरच्या टप्प्यात आला आहे. आता फक्त दोन लढती शिल्लक आहेत. चेन्नई सुपर किंग्जने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आज होणाऱ्या लढतीत दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यापैकी एक संघ अंतिम फेरीत जाईल. अन्य संघातील खेळाडू ज्यांची संघात निवड झालेली नाही ते युएईमध्येच थांबले आहेत. तर बाकीचे खेळाडू भारतात परत येत आहेत. अशात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआने काही खेळाडूंना न सोडण्याचे आदेश दिले आहेत. वाचा- आयपीएलमध्ये खेळणाऱ्या ज्या संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे त्या संघातील खेळाडू, सपोर्ट स्टाफ यांना मायदेशात रवाना होण्यास सांगितले आहे. पण काही खेळाडूंना बीसीसीआयने युएईमध्ये थांबण्यास सांगितले आहे. यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनचा समावेश आहे. राजस्थान संघाला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. मंगळवारी बीसीसीआयने संजूला पुढील आदेश मिळेपर्यंत युएई न सोडण्याचे आदेश दिले आहेत. वाचा- संजूच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स संघाला साखळी फेरीचा अडथळा परा करता आला नसला तरी त्याच्या फलंदाजांना सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची अंतिम घोषणा १५ ऑक्टोबरला केली जाणार आहे. या संघात संजूला संधी दिली जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय संघात संजूची निवड होण्याची शक्यता अधिक आहे. कारण सध्या निवडण्यात आलेल्या संघातील काही खेळाडू जखमी आहेत तर काही जणांचा फॉर्म खराब आहे. संजूने आयपीएलच्या १४व्या हंगामातील दुसऱ्या सत्रात सात सामन्यात २०७ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ८७ इतकी होती. तो विकेटकीपर असल्याने त्याचा अतिरिक्त फायदा संघाला होऊ शकतो या शिवाय संजू फिल्डमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी ओळखला जातो. आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात हार्दिक पंड्या आणि राहुल चाहर यांची कामगिरी चांगली झाली नाही. सूत्रांकडून कळालेल्या माहितीनुसार संजूला युएईमध्ये थांबण्यास सांगितले आहे. राजस्थानचा संघ ७ ऑक्टोबरला आयपीएलमधून बाहेर पडला होता. आता पुढील काही दिवसात संजूला युएईमध्ये थांबण्यास का सांगितले गेले आहे याचे कारण समोर येईल. त्याच बरोबर अन्य कोणत्या खेळाडूंना युएईमध्ये थांबण्यास सांगितले आहे हे देखील कळेल.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3lz6O8M
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads