RCB v KKR : विराट कोहलीने एलिमानिटेरच्या सामन्यात केली मोठी चुक, आरसीबीला बसू शकतो मोठा फटका... - क्रिकेट प्रेमी

RCB v KKR : विराट कोहलीने एलिमानिटेरच्या सामन्यात केली मोठी चुक, आरसीबीला बसू शकतो मोठा फटका...

शारजा : कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या आजच्या महत्वाच्या सामन्यात विराट कोहलीने एक मोठी चुक केल्याचे पाहायला मिळाले आहे. कोहलीच्या या चुकीचा फटका आता आरसीबीच्या संघाला या सामन्यात बसू शकतो, असे संकेत मिळत आहेत. विराट कोहलीने कोणती मोठी चुक केली, पाहा...आजचा एलिमिनेटरचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे, कारण हा सामना गमावलेला संघ थेट आयपीएलच्या बाहेर पडणार आहे. पण याच महत्वाच्या क्षणी कोहलीकडून एक मोठी चुक झाली आहे. या सामन्यासाठी कोहलीचा अभ्यास कमी पडल्याचे पाहायला मिळाले आहे. कोहली यावेळी नाणेफेकीसाठी आला. केकेआरविरुद्धच्या या महत्वाच्या सामन्यात कोहलीने नाणेफेक जिंकली आणि त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण आतापर्यंतचा कोलकाताच्या संघाला युएईमधला रेकॉर्ड पाहिला तर त्यांनी इथे एकही सामना धावांचा पाठलाग करताना गमावलेला नाही. त्याचबरोबर आरसीबीचा संघ हा आतापर्यंत धावांचा पाठलाग यशस्वीपणे करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे कोहलीचा हा निर्णय दोन्ही बाजूंन चुकल्याचेच पाहायला मिळाले आहे. त्यामुळे या गोष्टीचा किती मोठा फटका आता आरसीबीच्या संघाला बसतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. आतापर्यंत कोहलीच्या नेतृत्वाखाली एकदाही आरसीबीच्या संघाला जेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळे कोहलीच्या कारकिर्दीवर हा एक मोठा ठपका बसू शकतो. त्यासाठी कोहली आजच्या सामन्यात जीवाचे रान करेल. आजचा सामना जिंकल्यावर पुन्हा एकदा आरसीबीला बुधवारी दिल्ली कॅपिटल्सबरोबर क्वालिफायर्स-२ या सामन्यात खेळावे लागेल. कोहलीने एलिमिनेटरच्या सामन्यापूर्वी नेमकं काय म्हटलं होतं, पाहा... आयपीएल जेव्हा सुरु होते, तेव्हा प्रत्येक सामन्यात दडपण असते. जसजसे प्ले-ऑफचे सामले जवळ येतात तेव्हा हे दडपण वाढायला सुरुवात होते. माझ्यामते क्वालिफायर्स आणि एलिमिनेटर हे दोन्ही शब्द दडपण अधिक वाढवत असतात. त्यामुळे या सामन्यांमध्ये खेळणे सोपे नसते. एलिमिनेटरमध्ये तर दुसरी संधीही नसते. जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळत असता तेव्हा तुम्ही जिंकत असता किंवा पराभवाचा सामना करावा लागतो. माझ्यामते जेव्हा तुमच्याकडे दोन पर्याय असतात तेव्हा तुमची मानसिकता ही निगेटीव्ह होते आणि त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो, असे कोहली म्हणाला होता.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3oN4FZf
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads