७०९०००००००० रुपये= एका IPL संघाची किमत; देशाच्या क्रीडा अर्थसंकल्पापेक्षा जास्त, पाहा काय-काय होऊ शकते - क्रिकेट प्रेमी

७०९०००००००० रुपये= एका IPL संघाची किमत; देशाच्या क्रीडा अर्थसंकल्पापेक्षा जास्त, पाहा काय-काय होऊ शकते

दुबई: आयपीएलच्या १५व्या हंगामात दोन नवे संघ दिसणार आहे. काल बीसीसीआयने त्याची घोषणा केली. लखनौ आणि अहमदाबाद या शहरातील दोन संघ आयपीएलमध्ये असतील, त्यामुळे स्पर्धेतील संघांची संख्या ८ वरून १० झाली आहे. या दोन्ही संघांची किमत १२ हजार ७१५ कोटी रुपये इतकी आहे. इतकी रक्कम मिळेल असे बीसीसीआयला देखील वाटले नव्हते. लखनौ संघासाठी संजीव गोएंका यांनी ७ हजार ९० कोटी इतकी बोली लावली. आयपीएलची सुरुवात जेव्हा झाली होती तेव्हा सर्वात महाग संघ मुंबई इंडियन्स होता. यासाठी १११.९० मिलियन डॉलर मोजण्यात आले होते. वाचा- देशाच्या क्रीडा अर्थसंकल्पापेक्षा अधिक संघाची किमत २००८ साली अमेरिकन डॉलरची किमत ४८-४९ रुपये होती. आज तो ७५ रुपयांवर गेला आहे. भारताचे २०२१-२२चे क्रीडा बजेट २ हजार ५९६.१४ कोटी आहे. यावरून गोएंका याच्या RP-SG ग्रुपने किती मोठी बोली लावली आहे याचा अंदाज येईल. आयपीएलमध्ये नव्याने येणाऱ्या दोन संघांकडून १० हजार कोटी रुपये मिळतील असा अंदाज होता. पण बीसीसीआयला १२ हजार ५०० कोटी इतकी रक्कम मिळाली आहे. वाचा- ७ हजार ९० कोटीमध्ये काय काय करता येईल >> आयपीएलमधील सध्याच्या ८ संघांचे मुल्य ७२३.५९ मिलियन इतके आहे. त्याच्या पेक्षा किती तरी जास्त लखनौ संघाचे मुल्य आहे. >> इतक्या रक्कमेत देशात ६ एम्स रुग्णालये तयार करता येतील. >> दिल्ली एम्सचे बजेट ३ हजार ८०० कोटींची आहे. >> लिलावात सर्वाधिक बोली लागलेल्या लियोनार्डो दा विंची या चित्राला २०१७ साली ३ हजार ५०० कोटी इतकी बोली लावली होती. >> लेह-मनाली महामार्गावरील अटल बोगदा तयार करण्यास ३ हजार २०० कोटी इतका खर्च आला होता. >> आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात येणारा नवा पुल ३ हजार ९४ कोटी रुपयांना तयार होतोय. >> देशाचे क्रीडा अर्थसंकल्प फक्त २ हजरा ५९६ .१४ कोटींचे आहे. >> भारताला एक राफेल फायटर १ हजार ६७० कोटी रुपयांना मिळाले. ७ हजार ९० कोटीमध्ये चार राफेल आले असते. >> नव्य संसद भवनाच्या निर्मितीसाठी टाटाला ८६१.९० कोटींना निवदा मिळाली होती. वाचा- RP-SG ग्रुपने का इतकी बोली लावली गोएंका याच्या मते, आयपीएलने मोठ मोठे ब्रॅड तयार केले आहेत. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि अन्य काही. ही सर्व नावे मोठी आहेत. ७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणे व्यावहारिक आहे का तर यावर गोएंका म्हणले, भविष्यात फायदा होईल. १० वर्षात ही रक्कम अनेक पटीने वाढू शकते.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/2Zl5Btg
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads