रणवीर-दीपिका क्रिकेटमध्ये धमाका करण्यास सज्ज; विकत घेणार IPL मधील नवा संघ - क्रिकेट प्रेमी

रणवीर-दीपिका क्रिकेटमध्ये धमाका करण्यास सज्ज; विकत घेणार IPL मधील नवा संघ

नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगाम नुकताच पार पडला. अंतिम मॅच होऊन अद्याप २ आठवडे देखील झाले नाही तर आयपीएलच्या पुढील म्हणजे १५व्या हंगामाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मध्ये दोन नवे संघ दाखल होणार आहेत. ज्यामुळे संघांची संख्या ८ वरून १० इतकी होईल. वाचा- काही मीडिया रिपोर्टसनुसार अडानी, बिर्ला सारखे मोठे उद्योग समूह नव्या संघांसाठी बोली लावणार आहेत. यात आता आणखी एक मोठे नाव जोडले गेले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह () यांना देखील आयपीएलमधील संघ विकत घ्याचा असल्याचे कळते. हे वृत्त बाहेर पडताच सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू झाली. काहींनी त्यावर गंमतीशीर प्रतिक्रिया देखील देण्यास सुरुवात केली. वाचा- बीसीसीआयने आयपीएलमधील नव्या संघांसाठी टेंडर विकेत घेण्याचा कालावधी २० ऑक्टोबर वाढवून दिला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन नव्या फ्रेंचाइजीची प्रत्येकी किमत ३ हजार ५०० कोटींपेक्षा कमी असणार नाही. २०२२ मध्ये आयपीएलमध्ये दोन नवे संघ जोडण्याची बीसीसीआयची योजना आहे. यात अहमदाबाद, लखनऊ आणि पुणे ही शहर आघाडीवर आहेत. यामाध्यमातून बीसीसीआयची ७ हजार कोटींची कमाई होऊ शकते. या दोन्ही संघांचे आधार मुल्य २ हजार कोटी इतके ठवले आहे. वाचा- नव्या दोन संघांसाठी कोटक ग्रुप, ओरोबिंदो फार्मा, टोरेंट फार्मा, आरपी-संजीव गोयंगा ग्रुप, बिर्ला ग्रुप आणि अदानी ग्रुप उत्सुक आहे. बीसीसीआयने तिघांना मिळून एका संघासाठी बोली लावण्याची परवानगी दिली आहे. नव्या संघाची घोषणा २५ ऑक्टोबर रोजी दुबईत केली जाणार आहे.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3nniyet
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads