IPLच्या इतिहासातील सर्वात थरारक ४ षटके; पुण्याच्या क्रिकेटपटूने केली कमाल - क्रिकेट प्रेमी

IPLच्या इतिहासातील सर्वात थरारक ४ षटके; पुण्याच्या क्रिकेटपटूने केली कमाल

शारजाह : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. अखेरच्या चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत विजेता ठरत नाही. याचा अनुभव आयपीएल २०२१ मध्ये काल बुधवारी झालेल्या क्वालिफायल लढतीत आला. आणि यांच्यात झालेल्या लढतीत विजयासाठी १३६ धावांचे आव्हान कोलकाता एकतर्फी पार करेल असे वाटत होते, पण सामना अखेरच्या षटकापर्यंत गेला. वाचा- कोलकाताने पहिल्या विकेटसाठी ९६ धावांची भागिदारी केली होती. शुभमन गिल आणि वेंकटेश अय्यर यांनी १२.१ षटकात ९६ धावा केल्या होत्या. विजयासाठी फक्त ४० धावांची गरज होती. अय्यर ५५ धावांवर बाद झाला. त्यानंतर राणा-गिल जोडीने संघाला १२३ पर्यंत पोहोचवले. १५.५ षटकापर्यंत सामना केकेआरच्या बाजूला होता. पण त्यानंतर मात्र दिल्लीच्या गोलंदाजांनी कमाल केली. नॉर्जेने १६व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर राणाला बाद केले. आता कोलकाताला २४ चेंडूत विजयासाठी १३ धावांची गरज होती. हातात ८ विकेट शिल्लक होत्या. दिल्लीने देखील विजयाची आशा सोडली होती. आवेश खानने १७व्या षटकात एक विकेट घेतली आणि फक्त दोन धावा दिल्या. आता केकेआरला १८ चेंडूत ११ धावांची गरज होती. पंतने रबाडाच्या हातात चेंडू दिला. या षटकात त्याने कमालच केली. १८व्या षटकात केकेआरला फक्त १ धाव घेता आली आणि कार्तिक सारख्या फलंदाजांची विकेट देखील त्यांनी गमावली. विजयासाठी १२ चेंडूत १० धावा असे समीकरण झाले होते. वाचा- सामना अजून देखील केकेआरच्या हातात होता, पण दिल्लीच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. १९व्या षटकात नॉर्जे फक्त ३ धावा दिल्या आणि कर्णधार इयान मॉर्गनला बाद केले. अखेरच्या ६ चेंडूत केकेआरला ७ धावांची गरज होती. विजय मिळवण्याची संधी आता दोन्ही संघांनी होती. पंतने अनुभवी गोलंदाज अश्विनच्या हातात चेंडू दिला. अश्विने पहिल्या दोन चेंडूत फक्त एक धाव दिली. तिसर्या आणि चौथ्या चेंडूवर त्याने विकेट घेतली. केकेआरला विजयासाठी २ चेंडूत ६ धावांची गरज होती. पाचव्या चेंडूवर राहुल त्रिपाठीने षटकार मारला आणि केकेआरला तिसऱ्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचवले. हॅटट्रिकच्या चेंडूवर अश्विनला षटकार बसला आणि दिल्लीचा स्वप्न भंग झाला. वाचा-


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3BK4UIi
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads