IPL FINAL : महेंद्रसिंग धोनी कसा बनला कॅप्टन कूल, सुनील गावस्करांनी केला मोठा खुलासा... - क्रिकेट प्रेमी

IPL FINAL : महेंद्रसिंग धोनी कसा बनला कॅप्टन कूल, सुनील गावस्करांनी केला मोठा खुलासा...

: दुबई : महेंद्रसिंह धोनीला () कॅप्टन कूल म्हणून क्रिकेट विश्वात ओळखले जाते. पण धोनी कसा कॅप्टन कूल बनला आहे, याचा खुलासा आता भारताने माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी केला आहे. गावस्कर पुढे म्हणाले की, ''धोनी त्या कर्णधारांपैकी एक आहे, जो आपल्या संघावर कोणताही दबाव आणत नाही. तो आपल्या खेळाडूंना मुक्तपणे खेळू देतो. ही धोनीबद्दलची सर्वात चांगली गोष्ट आहे. तो कोणाच्याही गेम प्लॅनमध्ये हस्तक्षेप करत नाही. आणि एकदा कर्णधाराला खात्री पटली की, काही हरकत नाही. ज्या ड्रेसिंग रुममध्ये धोनी आहे, त्याच ड्रेसिंग रूमचा भाग होण्याइतका मी नशीबवान नाही, पण मी पाहतो की तो कोणत्याही परिस्थितीत शांतता टिकवून ठेवतो. तो असाच कॅप्टन कूल बनला नाही. तो कधीही घाबरला नाही. ठाकूरने १९व्या षटकात पहिला चेंडू वाइड टाकला, तेव्हा तो थोडा रागावला होता. मी पहिल्यांदाच त्याला रागावताना पाहिले.'' गेल्या वर्षीच्या खराब कामगिरीमुळे धोनी आणि त्याच्या चेन्नई सुपर किंग्जला टीकेचा सामना करावा लागला होता. पण यावर्षी जोरदार पुनरागमन करत आयपीएल २०२१ चे जेतेपद जिंकले आहे. चेन्नईचे हे चौथे आयपीएल जेतेपद आहे. सध्या जगभरातून धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. यामध्ये आता भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचाही समावेश आहे. चेन्नईने अंतिम सामन्यात कोलकाताला २७ धावांनी पराभूत करून जेतेपद पटकावले, तेव्हा गावस्कर धोनीचे कौतुक केल्याशिवाय राहू शकले नाहीत. पहिल्यापासूनच गावस्कर हे धोनीचे फॅन राहिले आहेत. त्यामुळे आयपीएल जेतेपदानंतर गावस्कर यांनी धोनीचे अभिनंदन करत काही गोष्टी सांगितल्या आहेत. चेन्नईने आयपीएल जिंकल्यानंतर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गावस्कर म्हणाले की, “धोनी खूप प्रभावी व्यक्ती आहे, कारण त्याने खेळाडूंवर विश्वास ठेवला आहे. खेळाडूची क्षमता काय आहे, हे तुम्हाला माहिती आहे. असे पण दिवस येतात, जेव्हा खेळाडू चांगली कामगिरी करत नाही. एक महान क्षेत्ररक्षकही झेल सोडू शकतो आणि ढिसाळ क्षेत्ररक्षण करू शकतो. एखादा फलंदाज फुलटॉस चेंडूवरही बाद होऊ शकतो. तसेच गोलंदाजही कधीकधी खराब गोलंदाजी करू शकतो, ज्यावर त्याला षटकार बसू शकतात, पण कर्णधार म्हणून जेव्हा तुम्हाला एखाद्या खेळाडूची क्षमता माहीत असते, तेव्हा तुम्ही त्याला वाईट दिवशी काहीही बोलत नाही. धोनी या कामात हुशार आहे."


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3j8OLVo
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads