IPL 2022च्या लिलावापूर्वी आली मोठी बातमी, प्रत्येक संघाला किती खेळाडू कायम ठेवता येतील पाहा... - क्रिकेट प्रेमी

IPL 2022च्या लिलावापूर्वी आली मोठी बातमी, प्रत्येक संघाला किती खेळाडू कायम ठेवता येतील पाहा...

नवी दिल्ली : पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये मोठा लिलाव होणार आहे. पण त्यापूर्वीच एक महत्वाची गोष्ट आता समोर आली आहे, ती म्हणजे या लिलावापूर्वी प्रत्येक संघाला काही खेळाडू आपल्याकडे कायम ठेवता येणार आहे. आयपीएलमध्ये यापूर्वीही मोठे लिलाव करण्यात आले आहेत. त्यामध्येही संघांना काही खेळाडू कायम ठेवण्याची संधी देण्यात आली होती. यावेळीही तशीच संधी प्रत्येक संघाला असेल. या लिलावापूर्वी आयपीएलमधील प्रत्येक संघाला चार खेळाडू कायम ठेवता येणार आहे. यामध्ये तीन भारतीय आणि एक परदेशी खेळाडू संघाला कायम ठेवता येणार आहे. जर संघाला हे समीकरण मान्य नसेल तर ते दोन भारतीय आणि दोन परदेशी खेळाडू संघात कायम ठेवू शकतात. पण दोनपेक्षा जास्त परदेशी खेळाडू कोणताही संघ कायम ठेवू शकत नाही. आयपीएलचा लिलाव नेमका कधी होईल, याबाबतची कोणतीही माहिती आतापर्यंत समोर आलेली नाही. पण लिलावासाठी प्रत्येक संघाकडे ८५ ते ९० कोटी एवढी रक्कम असू शकते. त्यानुसार प्रत्येक संघाला आपले खेळाडू निवडावे लागणार आहे. त्यामुळे आता कोणत्या चार खेळाडूंना आपल्या संघात कायम ठेवायचे, हा मोठा प्रश्न प्रत्येक संघाकडे असेल. त्यामुळे आता पुढच्या आयपीएलसाठी संघमालक कोणत्या खेळाडूंवर विश्वास दाखवतात आणि कोणाला लिलावासाठी रिंगणार उतरवतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असेल. जर आठ संघांनी प्रत्येकी चार खेळाडू कायम ठेवले तर ३२ खेळाडूंच्या भविष्याचा निर्णय आयपीएलच्या लिलावापूर्वीच होणार आहे. या चार खेळाडूंमध्ये संघांचे आयकॉन खेळाडू असतील. त्याचबरोबर संघाचा चेहरा झालेल्या खेळाडूंचाही यामध्ये समावेश करण्यात येऊ शकतो. पण जे खेळाडू भारतीय संघातून खेळलेले नाहीत त्यांना संघांनी कायम ठेवले नाही तर चालू शकते. पण सध्याचा घडीला बरेच खेळाडू राष्ट्रीय संघाकडून खेळलेले आहेत. त्यामुळे आता कोणत्या चार खेळाडूंना संघात कायम ठेवायचे, हा निर्णय घेणे प्रत्येक संघासाठी कठीण असेल. त्यामुळे आता कोणते खेळाडू संघात कायम राहतात आणि कोणते लिलावासाठी उपलब्ध होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/2XU2RCL
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads