IPL 2022 : आयपीएल ट्रॉफीबरोबरच महेंद्रसिंग धोनीने चाहत्यांना दिली अजून एक गुडन्यूज, जाणून घ्या कोणती... - क्रिकेट प्रेमी

IPL 2022 : आयपीएल ट्रॉफीबरोबरच महेंद्रसिंग धोनीने चाहत्यांना दिली अजून एक गुडन्यूज, जाणून घ्या कोणती...

: दुबई : चेन्नई सुपर किंग्सने शुक्रवारी आयपीएल २०२१ च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून चौथ्यांदा जेतेपद पटकावले. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने या आधी २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये विजेतेपद पटकावले आहे. हा विजय धोनीच्या चाहत्यांसाठी आणखी खास ठरला आहे. त्याला कारणही तसंच आहे. कारण धोनीने या जेतेपदानंतर आपल्या चाहत्यांना अजून एक आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियात सध्या धोनीच्या एका गोष्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. असे म्हटले जात आहे की, धोनीची पत्नी साक्षी गर्भवती आहे आणि लवकरच त्यांच्या घरी एक छोटासा पाहुणा येणार आहे. धोनीचा जवळचा मित्र आणि चेन्नई संघातील सहकारी सुरेश रैनाची पत्नी प्रियंका रैना हिने साक्षीच्या प्रेग्नेंसीबाबत माहिती दिली आहे. साक्षी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले जात आहे. साक्षीने २०१५ मध्ये मुलगी जीवाला दिला जन्म साक्षीने २०१५ मध्ये त्यांची पहिली मुलगी जीवाला जन्म दिला. जेव्हा जीवाचा जन्म झाला होता, तेव्हा धोनी ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या विश्वचषकात संघाचे नेतृत्व करत होता. जीवाच्या जन्मानंतरही तो देशात परतला नाही. मुलीच्या जन्मानंतर सुमारे तीन महिन्यांनी त्याने आपल्या मुलीला पाहिले होते. जीवा अनेकदा तिच्या वडिलांना चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये दिसते. शुक्रवारी देखील अंतिम सामन्यादरम्यान, साक्षीसह जीवा सीएसके संघासाठी चीअर करण्यासाठी आली होती. या सामन्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये सामना जिंकल्यानंतर साक्षी धोनीला मैदानात मिठी मारताना दिसली. यावेळी जीवादेखील तिच्या पालकांसोबत विजय साजरा करताना दिसली. धोनीने केले केकेआरचे कौतुक अंतिम सामन्यातील विजयानंतर महेंद्रसिंह धोनीने केकेआरच्या संघाचे जोरदार कौतुक केले. तो म्हणाला, 'कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंनी या हंगामात ज्याप्रकारे कामगिरी केली, ती नक्कीच कौतुकास्पद आहे. हंगामाच्या पूर्वार्धात केकेआरला ७ पैकी फक्त २ सामने जिंकता आले. अशा स्थितीत उत्तरार्धात इतके सामने जिंकणे आणि अंतिम फेरीत स्थान मिळवणे, ही एक उत्तम कामगिरी म्हणता येईल. यासाठी त्यांच्या खेळाडूंचे आणि सपोर्ट स्टाफचे कौतुक केले पाहिजे. ते खरोखरच जिंकण्यासाठी पात्र होते.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3FU8uSA
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads