IPL 2021 : विराट कोहलीच्या RCBला मोठा धक्का; दोन खेळाडूंनी अर्ध्यातूनच सोडली साथ - क्रिकेट प्रेमी

IPL 2021 : विराट कोहलीच्या RCBला मोठा धक्का; दोन खेळाडूंनी अर्ध्यातूनच सोडली साथ

शारजाह : आयपीएल २०२१च्या एलिमिनेटर सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर आज कोलकाता नाईट रायडर्सचं आव्हान आहे, पण या सामन्यापूर्वी आरसीबीच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील दोन खेळाडू स्पर्धा अर्ध्यावरती सोडून मायदेशी परतले आहेत. हे दोन्ही खेळाडू आता उर्वरीत आयपीएलमध्ये आरसीबीचा भाग असणार नाहीत. आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा यूएईमध्ये सुरू होण्यापूर्वी त्यांना आरसीबीने आपल्या गोटात घेतले होते. वानिंदू हसरंगा आणि दुश्मंथा चमिरा हे ते दोन खेळाडू आहेत. टी-२० विश्वचषकातील पात्रता सामन्यांसाठी दोघेही श्रीलंका संघात सामील होतील. त्यामुळे दोघांनाही आरसीबीच्या बायो बबलमधून मुक्त करण्यात आले आहे. आरसीबीने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. वाचा- वानिंदू हसरंगानेही त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आरसीबीपासून वेगळे झाल्याची माहितीही दिली. तो म्हणाला, ''प्ले-ऑफसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला शुभेच्छा. सर्व सहकाऱ्यांचे आणि आरसीबी परिवाराचे मनापासून आभार. कदाचित या वर्षी आम्ही ट्रॉफी जिंकू. हा अनुभव अद्भुत होता. टीम मॅनेजमेंटपासून इतर सर्व काही चांगले होते. इथे सगळे बंधुता आणि मैत्रीचे नाते निभावतात. या संधीबद्दल मी कृतज्ञ आहे.'' वाचा- बदली खेळाडू म्हणून मिळाली संधी वानिंदू हसरंगा आणि दुश्मंता चमिरा यांना आरसीबीने आयपीएल २०२१ साठी बदली खेळाडू म्हणून निवडले होते. या दोघांनी अॅडम झांपा आणि केन रिचर्डसनसारख्या खेळाडूंची जागा घेतली होती. चमीराला एकही सामना खेळता आला नाही. हसरंगा दोन सामने खेळला, पण त्याला आपली छाप पाडता आली नाही. पहिल्याच सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात तो एक धाव करून नाबाद राहिला. गोलंदाजीत त्याला दोन्ही सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. वाचा- वानिंदू हसरंगा एक अष्टपैलू खेळाडू आहे. तो लेग स्पिन गोलंदाजी करण्यासाठी तसेच तळातल्या क्रमांकावर खेळायला येऊन झटपट धावा करण्यासाठी ओळखला जातो, पण आयपीएलमध्ये असे काही घडले नाही. पुढील आयपीएलमध्ये त्याच्यावर कोणता संघ बोली लावतो, हे पाहावं लागेल. वाचा-


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/2YAjBzj
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads