Finals : दिल्लीवर विजयासह कोलकाताचा संघ अंतिम फेरीत दाखल, दसऱ्याच्या दिवशी चेन्नईशी लढणार - क्रिकेट प्रेमी

Finals : दिल्लीवर विजयासह कोलकाताचा संघ अंतिम फेरीत दाखल, दसऱ्याच्या दिवशी चेन्नईशी लढणार

शारजा : कोलकाता नाइट रायडर्सने क्वालिफायर-२ या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवरदमदार विजय साकारत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. कोलाकाताच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत दिल्लीच्या संघाला १३५ धावांवर रोखण्यात यश मिळवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताच्या सलामीवीरांनी धडाकेबाज फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. या विजयासह कोलकाताचा संघ आता थेट अंतिम फेरीत पोहोतचला आहे आणि त्यांची गाठ पडणार आहे ती चेन्नईश सुपर किंग्सशी. १५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी या दोन्ही संघांमध्ये अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे. कोलकाताच्या संघाने यावेळी गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये अप्रतिम कामगिरी करत दिल्लीचे आव्हान संपुष्टात आणले. दिल्लीच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताच्या वेंकटेश अय्यर आणि शुभमन गिल यांनी संघाला दणकेबाज सुरुवात करून दिली. अय्यर आणि गिल या युवा सलीमीवीरांच्या जोडीने ९६ धावांची भागीदारी रचली. वेंकटेश अय्यरने यावेळी भन्नाट फलंदाजी करत दिल्लीच्या गोलंदाजांवर प्रहार केला. वेंकटेशने या सामन्यात ४१ चेंडूंत ४ चौकार आणि तीन षटाकारांच्या जोरावर ५५ धावांची अफलातून खेळी साकारली. गिलनेही यावेळी अय्यरला चांगली साथ दिली आणि त्यामुळे कोलकाताच्या संघाला या सामन्यात विजयावर शिक्कामोर्तब करता आले. तत्पूर्वी, कोलकाताने यावेळी नाणेफेक जिंकली आणि मॉर्गनचा हा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी योग्य असल्याचे दाखवून दिले. कारण दिल्लीच्या धडाकेबाज फलंदाजांवर केकेआरच्या गोलंदाजांनी यावेळी अंकुश ठेवल्याचे पाहायला मिळाले. गेल्या सामन्यात पृथ्वी शॉ चांगलाच चमकला होता. पण यावेळी त्याला १८ धावाच करता आल्या. पण वरुण चक्रवर्तीने यावेळी पृथ्वीला बाद करत दिल्लीला मोठा धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. शिखर धवनला यावेळी सर्वाधिक ३६ धावा करता आल्या. पण कर्णधार रिषभ पंत, शेमऱन हेटमायरसारखे आक्रमक फलंदाज यावेळी अपयशी ठरले आणि त्याचा मोठा फटका यावेळी दिल्लीच्या संघाला बसला. श्रेयस अय्यरने यावेळी नाबाद ३० धावांची खेळी साकारली खरी, पण त्यामध्येही जास्त आक्रमकता पाहायला मिळाली नाही.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3FTUU1F
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads