DC vs KKR Preview : फायनलमध्ये पोहोचण्याची अखेरची संधी, दिल्लीचा संघ का मारणार बाजी, जाणून घ्या... - क्रिकेट प्रेमी

DC vs KKR Preview : फायनलमध्ये पोहोचण्याची अखेरची संधी, दिल्लीचा संघ का मारणार बाजी, जाणून घ्या...

शारजा : फायनलमध्ये पोहोचण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. पण दोन्ही संघांचा विचार केला तर दिल्लीच्या संघाचेच पारडे जड दिसत आहे. दिल्लीचा संघ हा आयपीएलमध्ये २० गुणांसह अव्वल स्थानावर राहिला होता. पण त्यानंतर झालेल्या चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या क्वालिफायर-१ या सामन्यात दिल्लीला पराभव पत्करावा लागला. पण या पराभवानंतरही त्यांचे पारडे केकेआरविरुद्ध जड दिसत आहे. कारण दिल्लीच्या संघात फलंदाजी आणि गोलंदाजी हे दोन्ही विभाग दमदार कामगिरी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. पृथ्वी शॉ याला आता चांगलाच सूर गवसला आहे. त्याचबरोबर शिखर धवन, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शेमरॉन हेटमायरसारखे एकामागून एक दमदार फलंदाज दिल्लीच्या संघात आहेत. दिल्लीची गोलंदाजीही आतापर्यंत चांगली राहिलेली आहे. अवेश खान, कागिसो रबाडा आणि एनरिच नॉर्किया यांनी आतापर्यंत चांगला मारा केला आहे. त्याचबरोबर आर. अश्विनसारखा अनुभवी अष्टपैलू खेळाडू दिल्लीच्या ताफ्यात आहे. महत्वाच्या सामन्यांमध्ये अश्विनसारखा खेळाडू हा दिल्लीसाठी ट्रम्पकार्ड ठरू शकतो. त्यामुळे दिल्लीची फलंदाजी आणि गोलंदाजी भक्कम असल्याचेच पाहायला मिळाले आहे. केकेआरच्या संघाने एलिमिनेटरच्या सामन्यात आरसीबीवर दमदार विजय मिळवला आणि त्यांनी फायनलच्या दिशेने कूच केल्याचे पाहायला मिळाले. पण तरीही केकेआरसाठी फलंदाजी हा कच्चा दुवा सिद्ध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण दिनेश कार्तिक, इऑन मॉर्गनसारख्या दिग्गज खेळाडूंना आतापर्यंत एकही मोठी खेळी साकारता आलेली नाही. पण शुभमन गिल आणि वेंकटेश अय्यर यांनी आतापर्यंत संघाला चांगली सुरुवात करून दिली असून त्यामुळे त्यांना बरेच विजय मिळाले आहेत. त्याचबरोबर राहुल त्रिपाठीही धावा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण या तिघांचा अपवाद वगळता तर केकेआरच्या संघाला आतापर्यंत चांगली फलंदाजी करता आलेली नाही. केकेआरच्या संघात सुनील नरिन, वरुण चक्रवर्ती आणि शकिब अल हसनसारखे तीन दमदार फिरकीपटू आहेत आणि त्यांच्यावरच केकेआरच्या गोलंदाजीची भिस्त असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा विचार केला तर दिल्लीचा संघ केकेआरपेक्षा अधिक बलवान असल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्ली कॅपिटल्स : रिषभ पंत (कर्णधार), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, रिपल पटेल, शिखर धवन, शिमरोम हेटमायर, श्रेयस अय्यर, स्टीव स्मिथ, अमित मिश्रा, एनरिक नोत्र्जे, अवेश खान, बेन ड्वारशुइस, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, कुलवंत खेजरोलिया, लुकमान मेरीवाला, प्रवीण दुबे, टाम कुर्रन, उमेश यादव, अक्षर पटेल, ललित यादव, मार्कस स्टोइनिस, रविचंद्रन अश्विन, सॅम बिलिंग्स आणि विष्णु विनो. कोलकाता नाइट राइडर्स : इऑन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, गुरकीरत सिंह मान, करुण नायर, नीतीश राणा, राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, हरभजन सिंग, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लुकी फर्ग्युसन, पवन नेगी, एम प्रसिद्ध कृष्णा, संदीप वारियर, शिवम दुबे, टिम साउथी, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, बेन कटिंग, शाकिब अल हसन, सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, शेल्डन जैक्सन और टिम सीफर्ट.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3AzXAgM
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads