CSKला चॅम्पियन बनविल्यानंतर धोनीने कोलकाताच्या संघाला केला सलाम, जाणून घ्या नेमकं काय ठरलं कारण... - क्रिकेट प्रेमी

CSKला चॅम्पियन बनविल्यानंतर धोनीने कोलकाताच्या संघाला केला सलाम, जाणून घ्या नेमकं काय ठरलं कारण...

: पुणे : धोनी महान कर्णधार का आहे? तो इतर कर्णधारांपेक्षा वेगळा का आहे? हे त्याने आयपीएल २०२१ च्या अंतिम सामन्यानंतर केलेल्या वक्तव्यावरून दिसून येते. धोनीने चौथ्यांदा सीएसकेला चॅम्पियन बनवले. सामन्यानंतर जेव्हा त्याला संघ आणि त्याच्या कामगिरीबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने आपल्या प्रतिस्पर्धी केकेआरबद्दल पहिल्यांदा मत व्यक्त केले. कोलकाता नाईट रायडर्समधील खेळाडूंच्या सामर्थ्याचे त्याने कौतुक केले. केकेआरचे प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना सलाम केला. सीएसकेचा कर्णधार धोनीने सांगितले की, ज्या प्रकारे केकेआरने स्पर्धेत पुनरागमन केले आहे, त्या अर्थी ते आयपीएल स्पर्धा जिंकण्यासाठीचे प्रमुख दावेदार आहेत. पहिल्या ७ सामन्यांमध्ये फक्त २ विजय मिळवून अंतिम फेरीपर्यंत प्रवास करणे ही सोपी गोष्ट नाही, पण कोलकाता नाईट रायडर्सने ते करून दाखवले. कोरोनामुळे दुसऱ्या टप्प्यादरम्यान मिळालेल्या ब्रेकचा त्यांनी फायदा करून घेतला. याबद्दल कोलकाता संघाचे जितके कौतुक करावे, तितके कमी आहे. याचे श्रेय संपूर्ण टीम, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफला जाते. सीएसकेने अशी जिंकली आयपीएल २०२१ ची फायनल आयपीएल २०२१ च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव केला. सीएसकेचे लीगमधील हे चौथे जेतेपद ठरले. केकेआर संघालाही त्यांचे तिसरे आयपीएल जेतेपद जिंकण्याची संधी होती, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सने २० षटकांत ३ गडी बाद १९२ धावा केल्या. फाफ डु प्लेसिसने ८६ धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. याशिवाय रॉबिन उथप्पाने १५ चेंडूत ३१ धावा केल्या. ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली यांनी झटपट धावा करत कोलकाता नाईट रायडर्ससमोर १९३ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरच्या सलामीवीरांनी दणक्यात सुरुवात केली, पण नंतरच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही. त्याचा परिणाम असा झाला की, संघाला २७ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. धोनीने सांगितला विजयाचा फॉर्मुला अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या यशाचे श्रेय धोनीने आपल्या खेळाडूंना दिले. तो म्हणाला की, आम्हाला प्रत्येक सामन्यासह एक नवीन सामना जिंकून देणारा खेळाडू मिळाला. आमच्या सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. आम्हाला जोरदार पुनरागमन करायचे होते आणि तेच आम्ही केले. आमच्यासाठी प्रत्येक सरावाचे सत्र, बैठकीचे सत्र महत्वाचे होते. धोनीने यावेळी जगभरातील सीएसकेच्या चाहत्यांचे आभार मानले.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3AMy3RJ
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads