आजवर कोणाला न जमलेला वर्ल्ड रेकॉर्ड उद्या होणार; धोनी ठरणार जगातील पहिला... - क्रिकेट प्रेमी

आजवर कोणाला न जमलेला वर्ल्ड रेकॉर्ड उद्या होणार; धोनी ठरणार जगातील पहिला...

दुबई: आयपीएल २०२१ची फायनल मॅच उद्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. ही लढत आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. चेन्नईने आतापर्यंत ३ वेळा तर कोलकाताने २ वेळा विजेतेपद मिळवले आहे. यावेळी चेन्नईला चौथे तर कोलकाताला तिसरे विजेतेपद मिळवण्याची संधी आहे. केकेआरने २०१२ साली अंतिम फेरीत चेन्नईचा पराभव केला होता. तर दुसऱ्यांदा २०१४ साली पंजाबचा पराभव करत विजेतेपद मिळवले होते. चेन्नईने २०१०, २०११ आणि २०१८ अशी तीन विजेतेपद मिळवली आहेत. वाचा- उद्या होणाऱ्या अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीला एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. त्याच बरोबर चेन्नईने टी-२० चॅम्पियनस लीगचे दोन वेळा विजेतेपद मिळवले आहे. कर्णधार म्हणून धोनीने भारतीय संघाला वर्ल्डकप जिंकून दिला आहे. १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आयपीएलच्या फायनल सामन्यात जेव्हा मैदानात उतरेल तेव्हा तो टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ३००वा सामना खेळले. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी आजवर कोणी केलेली नाही. धोनीने टी-२० मध्ये आजवर २९९ सामन्यात नेतृत्व केले आहे. यापैकी १७६ सामन्यात विजय तर ११८ लढतीत पराभव स्विकारला आहे. वाचा- फायनलमध्ये चेन्नईचा पराभव केलाय केकेआरने... २०१२ साली केकेआरने अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून जेतेपद मिळवले होते. तेव्हा चेन्नईने १९० धावांचे लक्ष्य दिले होते. चेन्नईने २० षटकात ३ बाद १९० धावा केल्या होत्या. उत्तरा दाखल केकेआरने २ चेंडू राखून विजय साकारला होता. तेव्हा मलविंदर बिस्लाने ८९ तर जॅक कॅलिसने ४९ चेंडूत ६९ धावा केल्या होत्या. वाचा- ... धोनी काही दिवसांपूर्वी चेन्नईच्या मैदानावर चाहत्यांच्या समोर अखेरचा सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्याच बरोबर तो हे देखील बोलला होता की पुढे काही होईल माहिती नाही. मेगा लिलाव होणार आहे. त्यानंतर कशी रणनिती आखली जाईल हे आताच सांगू शकत नाही. वाचा-


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3j1pxYU
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads