फक्त या एकाच गोष्टीमुळे झाला दिल्ली कॅपिटल्सचा पराभव , प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगचा मोठा खुलासा... - क्रिकेट प्रेमी

फक्त या एकाच गोष्टीमुळे झाला दिल्ली कॅपिटल्सचा पराभव , प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगचा मोठा खुलासा...

शारजा : दिल्ली कॅपिटल्सला केकेआरविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आणि त्यांचे फायनलमध्ये पोहोचण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. पण दिल्लीच्या संघाचा फक्त एकाच गोष्टीमुळे पराभव झाल्याचे आता समोर आले आहे. कारण दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने याबाबत आता मोठा खुलासा केला आहे. रिकी पॉन्टिंगने कोणता मोठा खुलासा केला, पाहा...दिल्ली कॅपिटल्सच्या पराभाबाबत पॉन्टिंग म्हणाला की, " केकेआरविरुद्धच्या सामन्यासाठीआम्ही भरपूर विचार करत मार्कस स्टॉइनिसला संघात स्थान दिले होते. स्टॉइनिस हा दुखापतीमुळे तीन आठवडे संघात नव्हता. पण तो फिट असल्यामुळे त्याला खेळवण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. कारण स्टॉइनिस हा चांगली फटकेबाजी करू शकतो आणि अखेरच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजीही करू शकतो. पण आम्हाला सर्वात मोठा फटका बसला तो पहिल्या पॉवर प्लेमध्ये. कारण पहिल्या पॉवर प्लेमध्ये आम्हाला ३८ धावा करता आल्या, पण दुसरीकडे केकेआरच्या संघाने पहिल्या पॉवर प्लेमध्ये ५१ धावा फटकावल्या. माझ्यामते हेच आमच्या पराभवाचे कारण असावे. कारण पॉवर प्लेमध्ये आमच्याकडून चांगली फलंदाजी झाली नाही. त्याचबरोबर आम्ही सातत्याने विकेट्स गमावल्या. जर श्रेयस अय्यर आणि शेमरॉन हेटमायर यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी केली नसती तर आम्हाला १३० धावाही करता आल्या नसत्या. त्यामुळे पहिल्या पॉवर प्लेमुळे आमचा पराभव झाला आहे. कारण संघातील वेगवान गोलंदाजांनी जबरदस्त मारा केला आणि त्यामुळेच आम्हाला विजयाची आशा निर्माण झाली होती. पण आम्ही हा सामना जिंकू शकलो नाही." केकेआरने या सामन्यात नाणेफेक जिंकल्यावर दिल्लीला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले, त्यांचा हा निर्णय यावेळी योग्य ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण केकेआरने दिल्लीच्या संघाला माफक धावसंख्येत रोखले आणि त्यामुळेच त्यांच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. केकेआरच्या गोलंदाजांनीही यावेळी अचूक आणि भेदक मारा करत दिल्लीच्या फलंदाजांवर अंकुश ठेवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे केकेआरच्या विजयाच्या पाया हा गोलंदाजांनी रचला होता. या विजयासह आता त्यांना अंतिम फेरीत धडक मारली आहे.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/30spYVR
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads