चेन्नईच्या या एकाच खेळाडूने जिंकलीआहेत तब्बल १६ टी-२० जेतेपदं; भारताचा रोहित शर्मा आहे शर्यतीत - क्रिकेट प्रेमी

चेन्नईच्या या एकाच खेळाडूने जिंकलीआहेत तब्बल १६ टी-२० जेतेपदं; भारताचा रोहित शर्मा आहे शर्यतीत

: दुबई : चेन्नई सुपर किंग्सने शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) आयपीएलचे विजेतेपद पटकावले. त्याचबरोबर ट्वेन्टी-२० स्पर्धेची सर्वाधिक जेतेपदं जिंकण्याचा मान आता चेन्नईच्या एका खेळाडूने पटकावला आहे, आतापर्यंत त्याने तब्बल १६ जेतेपदं आपल्या नावावर केली आहेत. या विजयासह स्टार अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो सर्वाधिक टी-२० विजेतेपद जिंकणारा खेळाडू बनला. त्याने स्वतःच्या सहकारी खेळाडूला मागे टाकत या यादीत पहिले स्थान मिळवले. या यादीतील पहिल्या पाचमध्ये भारताच्या फक्त रोहित शर्माचा समावेश आहे. ड्वेन ब्राव्होने आतापर्यंत १६ टी-२० विजेतेपद पटकावले आहेत. ब्राव्होने २०१२ आणि २०१६ मध्ये दोन वेळा वेस्ट इंडिजसाठी टी-२० विश्वचषक जिंकला आहे. त्याचबरोबर त्याने तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद आणि एकदा चेन्नई सुपर किंग्जसाठी चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावले आहे. त्याने पाच वेळा सीपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. तसेच तो दोन वेळा बीबीएल टीम चॅम्पियनचा भागही राहिला आहे. त्याने जवळपास प्रत्येक टी-२० स्पर्धा जिंकली आहे. सर्वाधिक टी-२० विजेतेपदं पटकावणाऱ्यांच्या यादीत कायरन पोलार्ड दुसरा खेळाडू ठरला आहे. कायरन पोलार्डने आतापर्यंत १५ टी-२० जेतेपदे जिंकली आहेत. तो २०१० पासून मुंबई इंडियन्सशी संबंधित आहे आणि त्याने पाच आयपीएल विजेतेपद जिंकली आहेत. त्याने मुंबईकडून चॅम्पियन्स लीग टी-२० चे विजेतेपदही पटकावले आहे. त्याने २०१२ मध्ये वेस्ट इंडिजसाठी आयसीसी टी-२० विश्वचषकही जिंकला. सीपीएल (कॅरिबियन प्रीमियर लीग) व्यतिरिक्त त्याने बांगलादेश प्रीमियर लीग देखील जिंकली आहे. त्याचबरोबर त्याने देशांतर्गत टी-२० चे विजेतेपदही पटकावले आहे. या यादीत तिसरे स्थान पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज शोएब मलिकने पटकावले आहे. मलिकने आपल्या कारकिर्दीत १३ टी-२० विजेतेपद पटकावली आहेत. मलिकने २००९ मध्ये पाकिस्तानसाठी टी-२० विश्वचषक जिंकला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने राष्ट्रीय टी-२० चषक जिंकला आहे. त्याने बांगलादेश प्रीमियर लीग आणि कॅरिबियन प्रीमियर लीगचे विजेतेपदही पटकावले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर रोहित शर्मा या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. रोहितने आतापर्यंत १० टी-२० जेतेपदे जिंकली आहेत. २००७ साली टी-२० वर्ल्ड चॅम्पियन बनलेल्या भारतीय संघाचा तो भाग होता. त्याने डेक्कन चार्जर्ससाठी २००९ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले. यानंतर, त्याने कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्ससाठी पाच वेळा टी-२० चे विजेतेपद पटकावले. याशिवाय त्याने चॅम्पियन्स लीग टी-२० देखील जिंकली आहे. त्याने २०१६ मध्ये आशिया चषक जिंकला, जो टी-२० स्वरूपात खेळला गेला होता.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3DSxiZr
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads