श्रेयस अय्यर सोडणार दिल्ली कॅपिटल्स; समोर आलं मोठं कारण - क्रिकेट प्रेमी

श्रेयस अय्यर सोडणार दिल्ली कॅपिटल्स; समोर आलं मोठं कारण

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) दिल्ली कॅपिटल्स संघाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. अनुभवी खेळाडू दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडू शकतो. श्रेयस अय्यरला कर्णधारपदाची भूमिका बजावायची आहे. त्यामुळे या कारणास्तव तो दिल्ली कॅपिटल्स सोडून इतर काही संघात शक्यता शोधू शकतो. वाचा- श्रेयस अय्यरकडे आयपीएल २०१८ (IPL 2018) च्या मध्यात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व सोपविण्यात आले. गौतम गंभीरने कर्णधारपद सोडण्याची घोषणा केल्यानंतर अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीची कामगिरी चांगली झाली. त्याने आपल्या संघाला पहिल्यांदा प्ले-ऑफ आणि नंतर आयपीएल २०२० च्या अंतिम फेरीत नेले होते. वाचा- दरम्यान, आयपीएल २०२१ दरम्यान तो दुखापतीचा बळी ठरला आणि त्याच्या जागी ऋषभ पंतला कर्णधार बनवण्यात आले. पंतच्या नेतृत्वाखालीही दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी चांगली झाली आणि संघ पुन्हा एकदा प्लेऑफसाठी पात्र ठरला. श्रेयस अय्यरला करायचंय नेतृत्व दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझी यापुढे ऋषभ पंतला कर्णधारपदावरून हटवू इच्छित नाही आणि या कारणास्तव अय्यर संघ सोडू शकतो आणि लिलावात जाऊ शकतो. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, श्रेयस अय्यरला नेतृत्व करायचं असल्याने, कर्णधारपदाची भूमिका निभावयाची असल्यामुळे तो दिल्ली कॅपिटल्स सोडू शकतो. वाचा- खरे तर आयपीएलच्या पुढच्या हंगामात आणखी दोन नवीन संघ येणार आहेत. लखनऊ आणि अहमदाबादचे संघ आगामी आयपीएल २०२२चा भाग असतील. त्यामुळे अनेक संघांना नव्या कर्णधाराची गरज आहे. विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर आरसीबीलाही एका कर्णधाराची गरज असून श्रेयस अय्यरला नक्कीच कोणत्या तरी संघात संधी मिळू शकते. याशिवाय पंजाब किंग्स त्यांच्या कर्णधारपदातही बदल करू शकतात.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3BkMdK4
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads