आयपीएलच्या नवीन संघांची घोषणा झाल्यावर फारारी ललित मोदीचे ट्विट व्हायरल, पाहा काय म्हणाला... - क्रिकेट प्रेमी

आयपीएलच्या नवीन संघांची घोषणा झाल्यावर फारारी ललित मोदीचे ट्विट व्हायरल, पाहा काय म्हणाला...

नवी दिल्ली : आयपीएलच्या दोन नवीन संघांची आज घोषणा करण्यात आली. ही घोषणा झाल्यावर भारतामध्ये आयपीएलची सुरुवात करून त्यानंतर फरार झालेल्या ललित मोदीचे एक ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. ललित मोदीने नेमकं काय म्हटलं आहे, पाहा...ललित मोदीने शरद पवार यांच्यापुढे आयपीएलचा प्रस्ताव ठेवला होता. पण काही वर्षांतच मोदी आयपीएलच्या फायनलनंतर फरार झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर मोदीने आयपीएलमधील काही खेळाडूंवर मॅच फिक्सिंगसारखे आरोपही केले होते. पण आता आयपीएलमधील दोन नवीन संघांची घोषणा झाल्यावर मोदीने एक ट्विट केले आहे आणि ते चांगलाच व्हायरल झाले आहे. मोदीने या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " आयपीएलमध्ये दोन नवीन संघांची बोली जिंकणाऱ्यांचे अभिनंदन. आयपीएलमध्ये लखनौच्या संघासाठी ७००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांची बोली लावण्यात आली, त्याचबरोबर अहमदाबादचा संघ ५ हजार पेक्षा जास्त कोटी रुपयांना विकला गेला, हे सर्व आश्चर्यकारक आहे." आयपीएलमध्ये ७५३ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी मोदीला अटक करण्यात येणार होती, पण त्यापूर्वीच तो लंडनला पळून गेला. ही गोष्ट २०१० साली मे महिन्यात घडली होती. मोदीनेच आयपीएलला सुरुवात केली होती. २००८ ते २०१० या कालावधीत मोदी हा आयपीएलचा सर्वेसर्वा असल्याचेच पाहायला मिळत होते. पण या दोन वर्षांमध्ये मोदीने आयपीएलमध्ये मोठे भ्रष्टाचार केले आणि त्यामुळेच त्याच्यावर भारत सोडून जाण्याची वेळ आली. जोपर्यंत बीसीसीआयबरोबरचे त्याचे हे प्रकरण मिटत नाही, तोपर्यंत तो भारतामध्ये येऊ शकत नाही. आयपीएमलधील ंसघ विकत घेण्यासाठी बीसीसीआयने निविदा मागवल्या होत्या. त्यानुसार दोन संघांसाठी २२ कंपन्यांनी अर्ज केले होते. आयपीएलच्या या दोन संघांची निवड करण्यासाठी तब्बल ४ तास अर्जांची छाननी करण्यात आली आणि त्यानंतर सर्वाधिक ७१०० कोटी रुपयांची बोली संजीव गोएंका यांनी लावल्याचे समोर आले. संजीव गोएंका यांनी यापूर्वी आयपीएलमध्ये पुण्याचा संघ विकत घेतला होता. दोन वर्षे हा संघ आयपीएलमध्ये खेळला होता. त्यानंतर पुन्हा एकदा संजीव गोएंका यांनी आयपीएलमध्ये एंट्री घेतली आहे. पण यावेळी त्यांनी पुण्याच्या शहराचे नाव आपल्या संघाला दिलेले नाही, तर त्यांनी लखनौ या शहराकडून आपला संघ उतरवणार असल्याचे जाहीर केले आहे.आयपीएलमध्ये दुसरा संघ सीव्हीसी कॅपिटल या कंपनीने ५६२४ कोटी रुपये खर्च करत विकत घेतला आहे. हा संघ अहमदाबाद शहराचा असेल.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3BcCWnl
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads