मोठी बातमी... विराट कोहलीनंतर अजून एक कर्णधार सोडणार आयपीएलच्या संघाचे नेतृत्व, जाणून घ्या कोण... - क्रिकेट प्रेमी

मोठी बातमी... विराट कोहलीनंतर अजून एक कर्णधार सोडणार आयपीएलच्या संघाचे नेतृत्व, जाणून घ्या कोण...

नवी दिल्ली : विराट कोहलीने आयपीएलचे कर्णधारपद सोडले आहे. आता कोहली आयपीएलमध्ये यापुढे कर्णधार म्हणून दिसणार नाही. कोहलीबरोबर अजून एक कर्णधार आता आयपीएलमधील कॅप्टन्सी सोडणार असल्याचे समोर येत आहे. विराट कोहलीनंतर आता कोणता कर्णधार आयपीएलचे नेतृत्व सोडणार आहे, जाणून घ्या....आयपीएलच्या दुसऱ्या सत्रापूर्वीच कोहलीने आपण कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले होते आणि त्यानुसार आता तो आरसीबीच्या कर्णधारपदी आता राहणार नाही. पण आता पंजाब किंग्सचा लोकेश राहुलही आपल्या संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे समोर आले आहे. २०१८ साली पंजाबच्या संघाने तब्बल ११ कोटी रुपये मोजत राहुलला आपल्या संघात स्थान दिले होते. त्यानंतर राहुलने दमदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आणि २०२० साली त्याला पंजाबच्या संघाचे कर्णधारपद देण्यात आले. गेल्या दोन वर्षांत राहुलची कामगिरी चांगली झाल्याचे पाहायला मिळाले. पण पंजाबचा संघ मात्र जेतेपद मात्र पटकावू शकला नाही, पण संघाच्या कामगिरीत मात्र सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. पण आता राहुलला पंजाबच्या संघाबरोबर राहायचे नसल्याचे समोर आले आहे. पंजाबचा सघ राहुलला कर्णधार म्हणून ठेवण्यासाठी तयार आहे. पण राहुलला जर संघाबरोबर राहायचे नसेल तर तो त्यांची साथ सोडू शकतो. त्यामुळे आता पुढचया वर्षी लोकेश राहुल हा पंजाबच्या संघात दिसणार नसल्याचे दिसत आहे. पुढच्या वर्षी आयपीएलचा मोठा लिलाव होणार आहे. त्यापूर्वी पंजाबच्या संघाने जर राहुलचं मन वळवलं, तरच तो या संघात पुन्हा दिसू शकेल. अन्यथा राहुल लिलावासाठी उपलब्ध असेल. लिलावात राहुलला यापेक्षा जास्त किंमतही मिळू शकते. त्यामुळेच राहुल पंजाबच्या संघाला सोडणार असल्याचे समजते आहे. पण नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. पण सध्याच्या घडीला तर राहुल पंजाबच्या संघाला अलविदा करण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता पंजाबच्या संघाला नवीन कर्णधार शोधावा लागणार असून त्यांच्यासाठी लिलावात नेमकं होतं, हे सर्वात महत्वाचं ठरणार आहे.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3mI8FHT
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads