विराट कोहलीने मैदानात घातला राडा; रागाच्या भरात पंचांबरोबरच भिडला, पाहा नेमकं घडलं तरी काय... - क्रिकेट प्रेमी

विराट कोहलीने मैदानात घातला राडा; रागाच्या भरात पंचांबरोबरच भिडला, पाहा नेमकं घडलं तरी काय...

शारजा : विराट कोहली केकेआरविरुद्धच्या सामन्यात चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. यावेळी रागाच्या भरात कोहली मैदानाती पंचांनाच भिडल्याचे पाहायला मिळाले. कोहलीला यावेळी आपल्या रागावर ताबा ठेवता आला आणि त्याने मैदानातच राडा घातल्याचे पाहायला मिळाले. नेमकं घडलं तरी काय, जाणून घ्या... ही गोष्ट घडली ती सातव्या षटकात. त्यावेळी आरसीबीचा फिरकीपटू युजवेंद्र चहल हा गोलंदाजी करत होता. या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर फटका मारताना कोलकाताचा राहुल त्रिपाठी अपयशी ठरला आणि चेंडू त्याच्या पॅडला लागला. त्यावेळी चहलसह आरसीबीच्या संघाने जोरदार अपील केले. पण मैदानातील पंचांनी राहुलला नाबाद ठरवले. त्यानंतर कोहलीने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तिसऱ्या पंचांनी पाहिलेल्य रिप्लेमध्ये राहुल हा बाद असल्याचे दिसत होते. राहुलला यावेळी तिसऱ्या पंचांनी बादही दिले. तिथेच खरंतर सर्वकाही संपले होते. पण कोहलीचा पारा तेव्हा चांगलाच चढलेला पाहायला मिळाला. कारण त्यावेळी तो मैदानातील पंचांकडे गेला आणि त्यांच्याशी हुज्जत घालायला लागला. कोणत्याही आदर्श कर्णधाराला ही गोष्ट नक्कीच शोभणारी नव्हती. कारण मैदानातील पंचांकडून चुक झाली, ही गोष्ट मान्य असली तरी तिसऱ्या पंचांनी त्याला बाद दिले होते. त्यानंतर मैदानातील पंचांशी वाद घालण्याचा कोणता संबंध नव्हता. पण कोहली यावेळी चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला होता. त्याने आपला राग यापद्धतीने काढल्याचे पाहायला मिळाले. कारण या पराभवानंतर कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीला एकदाही जेतेपद जिंकता आलेले नाही आणि हीच सल त्याला कायम बोचत राहील. आजच्या सामन्यात विराटने चांगली फलंदाजी केली, पण तरीही आरसीबीच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तेव्हाच आरसीबीचा पराभव जवळपास निश्चित झाला होता. त्यामुळे कोहली मैदानात चिडल्याचे पाहायला मिळाले. पण क्रिकेटसारख्या सभ्य गृहस्थांच्या खेळात ही गोष्ट कोणत्याही कर्णधाराला शोभणारी नक्कीच नाही. कारण चुक सुधारल्यावरही पंचांशी हुज्जत घालणे, याचे कोणीही समर्थन करू शकत नाही. त्यामुळे विराटला यावेळी कोणीही पाठीशी घालेल किंवा त्याची बाजू घेईल, असे वाटत नाही.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3oZKabE
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads