बाद झाल्यानंतर पुन्हा मैदानात आला आणि दोन षटकार मारले, पाहा काय झाले - क्रिकेट प्रेमी

बाद झाल्यानंतर पुन्हा मैदानात आला आणि दोन षटकार मारले, पाहा काय झाले

शारजाह : दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल २०२१ मधील क्वालिफायर २ ची लढत झाली. या लढतीत केकेआरने अखेरच्या षटकात बाजी मारली आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात एक अजब घटना झाली ज्यामुळे काही क्रिकेट चाहत्यांना आश्चर्य वाटले. वाचा- दिल्ली कॅपिटल्सच्या डावात एक फलंदाज कॅच आउट झाला. तो मैदान सोडून बाहेर देखील आला. पण त्यानंतर संबंधित चेंडू नो बॉल असल्याचे लक्षात आले, त्यामुळे फलंदाजाला पुन्हा मैदानात बोलवण्यात आले आणि त्याने दोन षटकार देखील मारले. दिल्लीच्या डावात १६वे षटक वरुण चक्रवर्तीने टाकले. षटकातील चौथ्या चेंडूवर शिमरॉन हेटमायरने लॉग ऑनला हवेत चेंडू मारला. शुभमन गिलने त्याचा शानदार कॅच घेतला. बाद झाल्यानंतर तो मैदानाबाहेर गेला आणि तेथेच नेमका ड्रामा सुरू झाला. तेव्हा हेटमायर ३ धावांवर खेळत होता. वाचा- वरुण चक्रवर्तीने टाकलेला तो चेंडू नो बॉल होता. पण हेटमायर मैदान सोडून गेला होता. तेव्हा तेथे उभे असलेले अंपायर अनिल चौधरी यांनी त्याला परत पाठवले. मैदानावर परत आलेल्या हेटमायरने त्यानंतर १४ धावा केल्या. त्यात दोन षटकारांचा समावेश होता. वेंकटेश अय्यरच्या थ्रोवर विकेटकीपर दिनेश कार्तिकने त्याला बाद केले. दिल्लीने प्रथम फलंदाजी करत केकेआरसमोर १३६ धावांचे लक्ष्य दिले होते. केकेआरने शानदार सुरुवात केली होती. पण अखेरच्या ५ षटकात दिल्लीने कडवी झुंज दिली आणि सामना २०व्या षटकापर्यंत नेला. अखेर केकेआरने १ चेंडू आणि ३ विकेट राखून विजय मिळवला.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3BIsOnc
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads