दिल्लीपेक्षा कोलकाताचं पारडं जड? शारजाहवरील आकडे काय सांगतात पाहा - क्रिकेट प्रेमी

दिल्लीपेक्षा कोलकाताचं पारडं जड? शारजाहवरील आकडे काय सांगतात पाहा

शारजाह : आयपीएल २०२१ क्वालिफायरचा दुसरा सामना बुधवारी (१३ ऑक्टोबर) सायंकाळी आणि यांच्यात शारजाहमध्ये खेळला जाईल. हा सामना सेमी फायनलसारखाच असणार आहे. कारण या सामन्यातील विजेता संघ १५ ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध जेतेपदाचा सामना खेळेल. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघ गेल्या दोन सामन्यात पराभूत झाला आहे, तर एकदिवसीय विश्वविजेता कर्णधार इयोन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली कोलकाताने बंगळुरूचा पराभव करत क्वॉलिफायर-२ मध्ये धडक मारली आहे. वाचा- खेळाडूंवर नजर टाकली, तर दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक धुरंधर फलंदाज आहेत, पण या क्षणी कोलकाताचं पारडं थोडं जड वाटत आहे. कारण शारजाहचं मैदान कोलकातासाठी लकी ठरत आहे. याच मैदानावर केकेआर संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीला ४ गडी राखून पराभूत केले आणि त्यांचे पहिले विजेतेपदाचे स्वप्न भंगले. या सामन्यात केकेआरच्या फिरकीपटूंचा पूर्णपणे दबदबा राहिला होता. वाचा- विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल आणि श्रीकर भारत या महत्वाच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढत मिस्ट्री फिरकीपटू सुनील नारायणने ४ षटकांच्या गोलंदाजीत बंगळुरूचा डाव संपुष्टात आणला होता. दुसरीकडे, वरुण चक्रवर्ती आणि शकिब अल हसन यांच्या विरुद्ध खेळणे देखील आरसीबीसाठी सोपे नव्हते. जर शारजाहवर केकेआरच्या फिरकीपटूंना पुन्हा साथ मिळाली आणि दिल्लीच्या खेळाडूंनी बंगळुरूसारखीच चूक केली, तर त्यांच्यासाठी सामना जिंकणं कठीण होऊ शकतं. वाचा- विशेष म्हणजे कोलकाता संघाने या मोसमात शारजाहमध्ये ३ सामने खेळले आहेत. दिल्लीविरुद्ध दोन आणि बंगळुरूविरुद्ध एक. कोलकात्याच्या गोलंदाजांनी या तीन सामन्यांमध्ये एकही षटकार खाल्ला नाही. यावरून केकेआरचे गोलंदाज शारजाहवर कशा प्रकारे गोलंदाजी करत आहेत, हे समजू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे संघात लॉकी फर्ग्युसन आणि सुनील नारायण वगळता एकही अनुभवी गोलंदाज नाही. वाचा- दिल्ली संघाच्या विरोधात जाणारी आणखी एक गोष्ट म्हणजे, चेन्नई विरुद्धचा सामना वगळता युएईमध्ये दिल्लीकडून एकाही फलंदाजाने अर्धशतकी खेळी केलेली नाही. या सामन्यात पृथ्वी शॉने ३४ चेंडूत ६० धावा केल्या, तर कर्णधार पंतने ३५ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या. या दोघांखेरीज हेटमायर चांगल्या फॉर्मात आहे, पण जर त्यांना केकेआरविरुद्ध विजय मिळवायचा असेल, तर फिरकीचं आव्हान मोडीत काढावं लागेल. संभाव्य प्लेइंग इलेव्हन : दिल्ली कॅपिटल्स : शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, मार्क्स स्टॉयनिस, अक्षर पटेल, कागिसो रबाडा, रविचंद्रन अश्विन, आवेश खान, एन्रिक नॉर्त्जे वाचा- कोलकाता नाईट रायडर्स : शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इऑन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, सुनील नारायण, शकिब अल हसन, शिवम मावी, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3BD2Q4P
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads