कर्णधारपद गेल्यावर रोहित शर्माची पत्नी रितिकाने काढली विराट कोहलीची विकेट, पोस्ट झाली व्हायरल - क्रिकेट प्रेमी

कर्णधारपद गेल्यावर रोहित शर्माची पत्नी रितिकाने काढली विराट कोहलीची विकेट, पोस्ट झाली व्हायरल

नवी दिल्ली : आता यापुढे विराट कोहली हा आयपीएलमध्ये आपल्याला नेतृत्व करताना दिसणार नाही. पण कोहलीकडून कॅप्टन्सी गेल्यावर रोहित शर्माची पत्नी रितिका सचदेवने कोहलीला ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले आहे. रितिकाची पोस्ट यावेळी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झालेली पाहायला मिळत आहे. रितीकाने सोशल मीडियावर नेमकं लिहिलंय तरी काय, जाणून घ्या....विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये विस्तवही जात नसल्याचे यापूर्वी सर्वांनाच समजले होते. मैदानात काही वेळा या गोष्टीचा प्रत्ययही आला होता. पण आता यापुढे कोहली आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही गोष्ट समोर आल्यावर रितीकाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सध्याच्या घडीला चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये रितीकाच्या चाहत्यांनी रोहित आणि कोहली यांचा एक आयपीएलमधील फोटो पोस्ट केला आहे. जेव्हा संघाचे कर्णधार नाणेफेकीला येतात, तेव्हाचा हा फोटो आहे. रोहित मुंबई इंडियन्सचा आणि कोहली आरसीबीचा कर्णधार असतानाचा हा फोटो रितीकाच्या चाहत्यांनी पोस्ट केला आहे. या फोटोखाली रितिकाच्या चाहत्यांनी एक कॅप्शनही दिली आहे. या कॅप्शनमध्ये रितीकाने लिहिले आहे की, " आता यापुढे आयपीएलमध्ये रोहित आणि विराट असे दिसणार नाहीत... " रितीका चाहत्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. काही जणांच्या मते रितीकाच्या चाहत्यांनी कोहलीला खिजवण्याचा एक प्रकार केला आहे. कारण यानंतर रोहित कर्णधारपदी कायम राहणार आहे, पण यानंतर कोहली आयपीएलमध्ये कॅप्टन्सी करू शकत नाही, असं रितीकाच्या चाहत्यांनी म्हटल्याचे काही जणांनी म्हटले आहे. काही जणांनी यावेळी रितीकाच्या चाहत्यांच्या बाजूनेही आपले मत मांडले आहे. कारण जे वास्तव आहे, हे रितीकाच्या चाहत्यांनी मांडले असून आता यापुढे रोहित आणि विराट यांच्यामध्ये वैमनस्य पाहायला मिळणार नाही, असे रितीकाच्या चाहत्यांना सांगायचे असल्याचे काही जणांनी म्हटले आहे. पण यापुढे रोहित आणि विराट हे यानंतर मैदानात नाणेफेकीसाठी येऊ शकत नाही, ही गोष्ट चुकीची नक्कीच नाही. पण हे रितीकाचं ट्विटर खातं नसून त्यांच्या फॅन्सने बनवलेलं हे अकाऊंट असल्याचे आता समोर आले आहे. पण या ट्विटमुळे क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3DDUg6t
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads