आयपीएल सुरु होणायापूर्वी विराट कोहलीने 'या' खेळाडूला केला WhatsApp मेसेज, पाहा काय लिहिलं होतं... - क्रिकेट प्रेमी

आयपीएल सुरु होणायापूर्वी विराट कोहलीने 'या' खेळाडूला केला WhatsApp मेसेज, पाहा काय लिहिलं होतं...

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या (virat kohli) नेतृत्वाखालील आरसीबी संघाचा पहिला सामना आता केकेआरबरोबर २० सप्टेंबरला होणार आहे. पण हा पहिला सामना होण्यापूर्वी विराटने संघातील एका खेळाडूला WhatsApp मेसेज () केल्याचे पाहायला मिळाले आहे. विराटने या मेसेजमध्ये नेमकं काय लिहिलं आहे, ही गोष्टही आता समोर आली आहे. विराटने या खास मेसेजमध्ये नेमकं लिहिलं तरी काय, पाहा..आयपीएल खेळण्यासाठी विराट दुबईमध्ये दाखल झाला आहे. यावेळी विराटने संघातील फिरकीपटी वानिंदु हसरंगाला एक खास मेसेज केला. या मेसेजमध्ये विराटने लिहिले आहे की, " युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलसाठी संघात बरेच बदल करण्यात आलेले आहेत. या संघात तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आपण या आयपीएलबाबत गेल्या महिन्यात सविस्तर बोललो होतो. पण आता तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. काही दिवसांतच क्वारंटाइनचा कालावधी संपणार असून आपण सर्व एकमेकांना भेटणार आहोत. मी तुम्हा सर्वांना कधी भेटणार, याची उत्सुकता मला लागलेली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच तुमच्या सर्वांनी मी भेट घेणार आहे." विराट कोहलीला खुणावतोय आयपीएमध्ये मोठा विक्रम... आयपीएलच्या या सत्रात कर्णधार विराट कोहलीला एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची संधी आहे. टी-२० क्रिकेटमध्ये विराट कोहलीला १० हजार धावा पूर्ण करण्यास फक्त ७१ धावांची गरज आहे. टी-२० क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला १० हजार धावांचा टप्पा पार करता आलेला नाही. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार असलेल्या विराटने आतापर्यंत ३११ टी-२० सामन्यात ९ हजार ९२९ धावा केल्या आहेत. यात पाच शतक आणि ७२ अर्धशतकांचा समावेश आहे. विराटची सरासरी ४१.७१ तर स्ट्राइक रेट १३३.९५ इतका आहे. विराटनंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टी-२० मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. रोहितच्या नावावर ३५० टी-२० सामन्यात ३२.१२च्या सरासरीने ९ हजार ३१५ धावा आहेत. त्यामुळे आता ही आयपीएल गाजवण्यासाठी विराट सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे विराट आता कशी फलंदाजी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3lmEZ2c
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads