RCB आणि विराटसाठी आनंदाची बातमी; या खेळाडूचे ४६ चेंडूत स्फोटक शतक - क्रिकेट प्रेमी

RCB आणि विराटसाठी आनंदाची बातमी; या खेळाडूचे ४६ चेंडूत स्फोटक शतक

दुबई: आयपीएल २०२१चे दुसरे सत्र १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. दुसऱ्या सत्रासाठी सर्व संघ जोरदार तयारी करत आहे. आयपीएलच्या पहिल्या सत्रात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने चांगली कामगिरी केली होती. आता दुसऱ्या सत्रात देखील अशीच चांगली कामगिरी करण्याचा त्यांचा विचार असेल. दुसरे सत्र सुरू होण्याआधी त्यांना एक चांगली बातमी मिळाली आहे. वाचा- आरसीबी संघातील महत्त्वाचा खेळाडू आणि विराट कोहलीचा खास दोस्त दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्व संघांना इशाराच दिला आहे. आयसीबीच्या सराव सामन्यात एबीने तुफानी शतक झळकावले आणि दुसऱ्या सत्रासाठी तो सज्ज असल्याचा इशारा दिला. वाचा- आयपीएलचे दुसरे सत्र सुरू होण्याआधी प्रत्येक संघ सराव सामने खेळत आहेत. अशाच एका सामन्यात एबीने ४६ चेंडूत १० षटकार आणि ७ चौकारांसह १०४ धावांची वादळी खेळी केली. विशेष म्हणजे या खेळीत एबीने पहिल्या १९ चेंडूत फक्त १९ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने स्फोटक फलंदाजी केली. वाचा- या सामन्यात एबीसह केएस भरत, मोहम्मद अझरूद्दीन आणि देवदत्त पडिक्कल यांनी शानदार फलंदाजी केली. भरतने ४७ चेंडूत ९५, अझरने ४३ चेंडूत ६६, देवदत्तने २१ चेंडूत ३६ धावा केल्या. दुसऱ्या सत्रात आरसीबीची पहिली लढत २० सप्टेंबर रोजी कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध होणार आहे. गुणतक्त्यात ते सध्या ७ पैकी ५ विजयासह तिसऱ्या स्थानावर आहेत.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3EkoPin
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads