IPLच्या पार्ट २ मधून संजय मांजरेकरांना पुन्हा डच्चू - क्रिकेट प्रेमी

IPLच्या पार्ट २ मधून संजय मांजरेकरांना पुन्हा डच्चू

नवी दिल्ली: आयपीएल २०२१चा दुसरे सत्र युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आयपीएलच्या या दुसऱ्या सत्राचा आनंद घेण्यासाठी हिंदी आणि इंग्रजीमधील समालोचकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक दिग्गज माजी खेळाडूंचा समावेश आहे. पण यांना पुन्हा एकदा डच्चू देण्यात आलाय. वाचा- काही वर्षापूर्वी संजय मांजरेकरांनी सोशल मीडियावरून रवींद्र जडेजा संदर्भात एक पोस्ट केली होती. त्यावरून बीसीसीआयने मांजरेकरांना पॅनलमधून बाहेर केले आहे. संबंधित घटनेनंतर मांजरेकरांना पुन्हा एकदा संधी दिली होती. पण गेल्या वर्षीपासून पुन्हा एकदा त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. चॅनल अशा व्यक्तींची निवड करते, ज्यांच्या नावांना बीसीसीआयची परवानगी असते. वाचा- हिंदी समोलोचकांमध्ये गौतम गंभीर, इरफान पठान, आकास चोप्रा, पार्थिव पटेल, किरण मोरे आणि निखिल चोप्रा यांचा समावेश आहे. इंग्रजीमध्ये सुनील गावस्कर, हर्षा भोगले, मुरली कार्तिक, केव्हिन पिटरसन सारख्या दिग्गज मंडळीचा समावेश करण्यात आलाय. वाचा- आयपीएलच्या दुसऱ्या सत्राची सुरूवात १९ सप्टेंबर रोजी होणार आहे तर १५ ऑक्टोबर रोजी अंतिम लढत होईल. या दुसऱ्या सत्रासाठी हिंदीत एकूण ९ समालोचकांना संधी दिली आहे. इंग्रजीसाठी १४ जणांचा समावेश केलाय.यात भारताचे ६, इंग्लंडचे ३, न्यूझीलंडचे २ तर ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्या एका समालोचकांचा समावेश आहे. या सत्रात एकूण ३१ लढती होणार आहेत. वाचा- भारतात झालेल्या आयपीएल २०२१ च्या स्पर्धे दरम्यान करोनाचा शिरकाव झाल्याने ही स्पर्धा ४ मे रोजी स्थगित करण्यात आली होती. आयपीएलच्या आयोजनानंतर युएईमध्येच आयसीसी टी-२० वर्ल्डकपचे आयोजन होणार आहे. आयपीएलच्या दुसऱ्या सत्रातील पहिली लढत ही मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन दिग्गज संघांमध्ये होणार आहे.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3z6l2BJ
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads