मुंबई इंडियन्सचं मराठी चाहत्यांसाठी खास धमाकेदार गाणं, रोहित शर्मा काय म्हणतो पाहा... - क्रिकेट प्रेमी

मुंबई इंडियन्सचं मराठी चाहत्यांसाठी खास धमाकेदार गाणं, रोहित शर्मा काय म्हणतो पाहा...

दुबई : मुंबई इंडियन्सने () आतापर्यंत प्रत्येकवेळा मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न केला आहे. आता मराठी चाहत्यांसाठी मुंबई इंडियन्सने एक खास धमाकेदार व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या संघाने यावेळी आपल्या मराठमोळ्या चाहत्यांसाठी हा एक खास व्हिडीओ बनवला आहे. मुंबई इंडियन्स हे एक कुटुंब आहे आणि त्याचा प्रत्येक सदस्य हा मराठी परंपरा जपत आला आहे. आता तर मुंबई इंडियन्सने खास मराठीमध्ये हा व्हिडीओ बनवत एकच धमाल उडवून दिली आहे. दुबईतील पहिल्या सामन्यापूर्वी आलेल्या या व्हिडीओने एकच धमाल उडवून दिली आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, धवन कुलकर्णी, आदित्य तरे, अर्जुन तेंडुलकरसह अन्य मुंबई इंडियन्सचे खेळाडू दिसत आहेत. सध्या मुंबई इंडियन्स खेळाडूने हे आयपीएलसाठी कसून सराव करत आहेत. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्सबरोबर १९ सप्टेंबरला होणार आहे. मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे हा सामना चांगलाच रंगण्याची शक्यता आहे. मैदानात खेळाडू खेळत असताना मैदानाबाहेरील पाठिंबा त्यांच्यासाठी महत्वाचा असतो. आतापर्यंत मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांतील चाहत्यांनी खेळाडूंवर मनापासून प्रेम केले आहे. त्यामुळे या हंगामात मुंबई आणि चेन्नईचे खेळाडू कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. रोहित शर्मा सध्या क्वारंटाइनमध्ये असून त्याने सराव सुरू केलाय. आयपीएलच्या दुसऱ्या सत्राची सुरूवात १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आयपीएलच्या दुसऱ्या सत्रासाठी रोहित शर्मा जोरदार तयारी करत आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे. २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० अशी पाच विजेतेपद त्यांच्या नावावर आहेत. या वर्षी मुंबईला हॅटट्रिकची संधी आहे. आतापर्यंत मुंबईने ७ पैकी ४ विजयासह गुणतक्त्यात चौथे स्थान मिळवले आहे. १९ तारखेला पहिली लढत चेन्नई विरुद्ध झाल्यानंतर त्यांची दुसरी लढत कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध होणार आहे.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3tJEd33
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads