मुंबई इंडियन्सचे टेन्शन संपले; रोहितने सुरू केली तयारी, या तारखेला मैदानात उतरणार - क्रिकेट प्रेमी

मुंबई इंडियन्सचे टेन्शन संपले; रोहितने सुरू केली तयारी, या तारखेला मैदानात उतरणार

दुबई: इंग्लंडविरुद्धची अखेरची कसोटी रद्द झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार आयपीएलच्या १४व्या हंगामाच्या दुसऱ्या सत्रासाठी युएईमध्ये दाखल झाला आहे. रोहित शर्मा सध्या क्वारंटाइनमध्ये असून त्याने सराव सुरू केलाय. आयपीएलच्या दुसऱ्या सत्राची सुरूवात १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पहिली लढत विरुद्ध यांच्यात होणार आहे. वाचा- मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्माचा हॉटेलमध्ये सायकलिंग करतानाचा फोटो शेअर केला आहे. आयपीएलच्या दुसऱ्या सत्रासाठी रोहित शर्मा जोरदार तयारी करत आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे. २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० अशी पाच विजेतेपद त्यांच्या नावावर आहेत. या वर्षी मुंबईला हॅटट्रिकची संधी आहे. रोहित हा स्पर्धेतील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. वाचा- वाचा- रोहित इंग्लंडहून जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांच्यासह शनिवारी युएईमध्ये पोहोचला होता. हे सर्व खेळाडू सहा दिवसांसाठी क्वारंटाइनमध्ये आहेत. वाचा- आयपीएलच्या पहिल्या सत्रात मुंबईने ७ पैकी ४ विजयासह गुणतक्त्यात चौथे स्थान मिळवले आहे. १९ तारखेला पहिली लढत चेन्नई विरुद्ध झाल्यानंतर त्यांची दुसरी लढत कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध होणार आहे. वाचा- अशा आहेत मुंबई इंडियन्सच्या लढत १९ सप्टेंबर , रविवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध, अबुधाबी २३ सप्टेंबर, बुधवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध, अबुधाबी २८ सप्टेंबर, सोमवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध, दुबई १ ऑक्टोबर, गुरुवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध , अबुधाबी ४ ऑक्टोबर, रविवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध , शारजा ६ ऑक्टोबर, मंगळवार - राजस्थान रॉयल्सविरुद्ध, अबुधाबी ११ ऑक्टोबर, रविवार - दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध, अबुधाबी


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3hz8RHo
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads