भारताच्या दिग्गज फलंदाजाने षटकार मारलेला चेंडू हरवला; पाहा काय झाले video - क्रिकेट प्रेमी

भारताच्या दिग्गज फलंदाजाने षटकार मारलेला चेंडू हरवला; पाहा काय झाले video

दुबई: आयपीएल २०२१मधील उर्वरीत ३१ लढती युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून खेळवले जाणार आहेत. आयपीएलमधील काही संघांतील खेळाडू युएईमध्ये दाखल झाले असून यात चेन्नई सुपर किंग्जचा देखील समावेश आहे. चेन्नई संघातील खेळाडूंनी सराव देखील सुरू केला आहे. या सरावातील कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- युएईमध्ये क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतर चेन्नई संघाने सराव सत्र सुरू केले. यात कर्णधार धोनी षटकार मारताना दिसत आहे. यातील एक षटकार इतक्या लांब गेला की बॉल शोधण्याची वेळ आली. धोनीने मारलेला चेंडू शोधण्यासाठी अन्य खेळाडू आणि स्टाफ गेले होते. पण त्यांना चेंडू सापडत नसल्याने अखेर धोनी स्वत: चेंडू शोधण्यासाठी आला. सराव सत्रातील धोनीची फलंदाजी पाहून तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसते. वाचा- वाचा- चेन्नई संघाने सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडियो व्हायरल होत आहे. या व्हिडिओत धोनीने पाच मोठे षटकार मारल्याचे दिसते. व्हिडिओमध्ये धोनी हे देखील म्हणतोय की चार बॉल म्हणत १४ बॉल खेळले. त्याचा हा फॉम पाहून चाहते खुश झाले आहेत. आयपीएल सुरू झाल्यावर देखील धोनीने अशीच फटकेबाजी करावी अशी त्यांची इच्छा असेल.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3BaXjl7
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads