श्रेयस अय्यर UAE मध्ये पोहोचला तरी दिल्ली कॅपिटल्सचे ठरेना कर्णधार कोणाला करायचे - क्रिकेट प्रेमी

श्रेयस अय्यर UAE मध्ये पोहोचला तरी दिल्ली कॅपिटल्सचे ठरेना कर्णधार कोणाला करायचे

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर भारतीय खेळाडू आयपीएलच्या १४व्या हंगामातील उर्वरीत लढती खेळण्यासाठी युएईमध्ये पोहोचतील. या स्पर्धेचे पहिले सत्र भारतात झाले होते. पण बायो बबलमध्ये करोनाचा शिरकाव झाल्याने स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. वाचा- आयपीएलमधील सर्व संघातील खेळाडू आता एकत्र येत आहेत. संघातील खेळाडू एकत्रपणे काही दिवसात युएईमध्ये पोहोचणार आहेत. अशात सोशल मीडियावर एका संघाबद्दलच्या चर्चेने जोर पकडला आहे. काही महिन्यांपूर्वी दिल्ली कॅपिटल्स()चा कर्णधार ()ला दुखापत झाली होती. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत झालेल्या दुखापतीमुळे श्रेयस आयपीएलमधून बाहेर झाला होता. तेव्हा दिल्ली संघाचे नेतृत्व ऋषभ पंत() कडे देण्यात आले होते. वाचा- आयपीएलच्या पहिल्या सत्रात पंत कुठेच कमी पडला नाही. त्याने दिल्ली संघाला आणखी एका उंचीवर पोहोचवले. पण तेव्हापासून एक चर्चा सुरू झाली आहे आणि आता त्या चर्चेने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात दिल्लीचे नेतृत्व कोण करणार. वाचा- युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात दिल्लीचे नेतृत्व कोणाला द्यायचे यावरून चाहत्यामध्ये चर्चा सुरू झाली आहे. श्रेयस अय्यर दुखापतीतून बाहेर आला आहे. तो तयारी देखील करत आहे. त्यामुळे आयपीएलसाठी उपलब्ध असणार हे निश्चित. अशात दिल्ली संघ व्यवस्थापनाने अद्याप कोणताही निर्णय जाहीर केला नाही. त्यामुळे चाहत्यांना देखील प्रश्न पडला आहे की कर्णधार कोण असेल. वाचा- पाहा दिल्लीच्या चाहत्यांची मते... दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व कोण करणार अद्याप जाहीर नाही केले संघ व्यवस्थापनाची अशी अवस्था झाली आहे श्रेयसच असणार कर्णधार चाहत्याने दिले हे कारण... कर्णधाराची निवड करणे सोपे नाही श्रेयस अय्यर युएईमध्ये दाखल झाला आणि सराव देखील सुरू केला


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/2W63FmP
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads