IPL फ्रँचायझींनी दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा; युवराजनेही शेअर केला जुन्या आठवणींचा व्हिडिओ - क्रिकेट प्रेमी

IPL फ्रँचायझींनी दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा; युवराजनेही शेअर केला जुन्या आठवणींचा व्हिडिओ

मुंबई : संपूर्ण देशभरात आज रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर विविध आयपीएल फ्रँचायझी आणि क्रिकेटपटूंनीही रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशभरातील अनेक नागरिक त्यांच्या बहिणींसोबतचे फोटो शेअर करत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे आणि युवराज सिंग यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. के.एल. राहुलच्या नेतृत्वाखालील आयपीएल टीम पंजाब किंग्सने आपल्या ट्विटरवरून एक फोटो ट्विट केला आहे. ज्यामध्ये कर्णधार के.एल. राहुल, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, दर्शन नळकांडे, ईशान पोरेल यांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केल्याचा फोटो आहे. फक्त प्रेमच नाही, तर एक धागाही आपलं जीवन आणि अंत:करण बांधतो, असं कॅप्शनही या फोटोला दिलं आहे. मुंबई इंडियन्सन ट्विट केला व्हिडिओ गतविजेता संघ मुंबई इंडियन्सही यात मागे नाही. या फ्रँचायझीने एक व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यात त्यांचे खेळाडू व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्या बहिणींशी बोलत दिसत आहेत. टीम सध्या अबू धाबीमध्ये असून अर्जुन तेंडुलकर, अनमोलप्रीत सिंग, युदवीर सिंग, आदित्य तारे हे खेळाडू त्यांच्या बहिणींशी संवाद साधताना दिसत आहेत. दिल्ली कॅपिटल्सचं अनोखं ट्विट दिल्ली कॅपिटल्सने रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा देताना एक हटके ट्विट केलं आहे. 'वर्षातील हा एक काळ आहे, जेव्हा प्रत्येक बहीण GRS म्हणजे गिफ्ट रिव्ह्यू सिस्टीमचा पर्याय निवडते आणि निर्णयही तिच्या बाजूने वळवते. सर्व बांधवांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा,' असं कॅप्शन या ट्विटला दिलं आहे. त्याची चर्चाही होत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पाठवल्या शुभेच्छा विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या चाहत्यांना रक्षाबंधनाच्या अत्यंत साध्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. फ्रँचायझीने इंग्रजी आणि कन्नड भाषेमध्ये ट्विट करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. सनरायझर्स हैदराबादच्या ट्विटनं जिंकलं मन सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या स्टाइलमध्ये रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट केलेल्या फोटोमध्ये एक लहान मुलगी हातात बॅट घेऊन फलंदाजी करताना दिसत आहे. आणि तिचा भाऊ तिला गोलंदाजी करत आहे. 'आपण आठवणी जतन करत आहोत, हे आम्हाला माहित नव्हतं. पण आम्ही आमचा आवडता खेळ खेळण्याचा आनंद घेत आहोत, हे आम्हाला माहीत आहे,' असं मस्तपैकी कॅप्शनही त्यांनी दिलं आहे. मास्टर ब्लास्टरला आली बहिणीची आठवण रक्षाबंधनानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही त्याच्या बहिणीची आठवण आली असून त्यानं एक ट्विट केलं. आहे. ''माझा मजबूत आधारस्तंभ असल्याबद्दल ताई तुझे धन्यवाद. तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल मी भाग्यवान आहे." युवराज, रहाणेनं दिल्या शुभेच्छा कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि भारताचा माजी तडाखेबंद फलंदाज युवराज सिंग यांनीही सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/388sq4c
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads