IPL 2021: विराट कोहलीची चिंता वाढली, आरसीबीच्या प्रशिक्षकांनी संघाची साथ सोडली - क्रिकेट प्रेमी

IPL 2021: विराट कोहलीची चिंता वाढली, आरसीबीच्या प्रशिक्षकांनी संघाची साथ सोडली

नवी दिल्ली : विराट कोहलीची चिंता आता चांगलीच वाढलेली दिसत आहे. कारण आतापर्यंत त्याच्या नेतृत्वाखाली संघाला एकदाही आयपीएल जिंकता आलेले नाही. त्याचबरोबर आता संघाच्या मुख्य प्रशिक्षकांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता आरसीबीचा संघ अडचणीत सापडला आहे. आरसीबीमध्ये बरेच बदल झाले आहेत. संघाचे मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिच यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज कॅटिच गेल्या वर्षी संघाचे प्रशिक्षक बनले होते. त्याच्या अनुपस्थितीत संघाचे क्रिकेट संचालक माईक हेसन मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारतील. आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी सर्व संघ सज्ज होत आहेत. काही संघ यूएईमध्ये दाखल झाले असून काही रवाना होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक संघांतील परदेशी खेळाडूंनी त्यांची नावे मागे घेतली आहेत. या पार्श्वभूमीवर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर ()ने दोन परदेशी खेळाडूंची बदली म्हणून नवीन खेळाडूंची नावेही जाहीर केली आहेत. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन आणि फिरकीपटू अॅडम झांपा तसेच न्यूझीलंडचा सलामीवीर फिन एलन यूएईमध्ये होणाऱ्या सामन्यांसाठी उपलब्ध राहणार नाही. यामुळे आरसीबीने ३ नवीन खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. सिंगापूरचा फलंदाज टीम डेव्हिड, श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुश्मंथा चमिरा यांचा संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या सामन्यांसाठी संघात समावेश आहे. वेगवान गोलंदाज चमिराने अलीकडेच भारताविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत भाग घेतला होता. केन रिचर्डसनची जागा भरण्यासाठी त्याचा समावेश करण्यात आला आहे. रिचर्डसनने या हंगामाच्या सुरुवातीला काही सामने खेळले, पण कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे झांपासह मध्यातूनच तो मायदेशी परतला. भारताला नाचवणाऱ्या हसरंगाची एन्ट्री चमिरा प्रमाणेच वानिंदू हसरंगानेही भारताविरुद्ध झालेल्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत भाग घेतला होता. आणि भारताच्या अननुभवी फलंदाजांना त्याच्या फिरकीत अडकवले होते. टी-२० मालिकेत हसरंगाची 'प्लेअर ऑफ द सीरिज' म्हणून निवड झाली आणि तेव्हापासून त्याला आयपीएलच्या काही संघात स्थान मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. यात आरसीबीने बाजी मारली. डेव्हिड आक्रमक फलंदाज फिन एलनची जागा भरण्यासाठी सिंगापूरचा आक्रमक फलंदाज टीम डेव्हिडचा समावेश करण्यात आला आहे. डेव्हिडने आतापर्यंत १४ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत, ज्यात त्याने १५८ च्या स्ट्राईक रेटने आणि ४६.५० च्या सरासरीने ५५८ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियन सलामीवीर जोश फिलिपच्या जागी फिन एलनचा आरसीबीने या वर्षी समावेश केला, पण तो एकही सामना खेळू शकला नाही. एलन आता न्यूझीलंड संघासह बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे, ज्यामुळे तो या हंगामात संघाचा भाग बनू शकणार नाही.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3j5fnXF
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads