IPL 2021 : न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूची KKR मध्ये एन्ट्री; टी-२० मध्ये आहेत २२४ विकेट्स - क्रिकेट प्रेमी

IPL 2021 : न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूची KKR मध्ये एन्ट्री; टी-२० मध्ये आहेत २२४ विकेट्स

: नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आयपीएल २०२१चे उर्वरित सामने खेळणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) न्यूझीलंडचा स्टार गोलंदाज टीम साऊदीला संघात समाविष्ट केले आहे. केकेआरने दोन वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे, पण चालू हंगामाच्या पहिल्या टप्प्यात संघाची कामगिरी चांगली राहिली नाही. दोन विजयांसह संघ सातव्या स्थानावर आहे. १९ सप्टेंबरपासून टी-२० लीगच्या दुसऱ्या टप्प्याचे सामने यूएईमध्ये खेळवले जाणार आहेत. क्रिकबझच्या बातमीनुसार, कमिन्सने कौटुंबिक कारणांमुळे आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केकेआरने पॅट कमिन्सच्या जागी टीम साउदीचा समावेश केला आहे. २०१९ मध्ये झालेल्या लिलावात कमिन्सला १५.५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. साउदी यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळला आहे. त्याने आयपीएलच्या ४० सामन्यांमध्ये ८.७३ च्या इकॉनॉमीने १२९३ धावा दिल्या आहेत आणि फक्त २८ विकेट्स घेतल्या आहेत. २०१९ मध्ये साउदी ठरला महाग झाली न्यूझीलंडचा ३२ वर्षीय वेगवान गोलंदाज टीम साउदी आयपीएलच्या ७ हंगामात खेळला आहे. शेवटच्या वेळी तो २०१९ मध्ये खेळला होता. त्यावेळी त्याने ३ सामन्यांमध्ये १३च्या इकॉनॉमीने धावांची खैरात केली होती. आणि त्याला फक्त एक विकेट मिळाली होती. २०१६ मध्ये त्याने सर्वाधिक ११ सामने खेळले आणि ९ विकेट्सही घेतल्या. त्याच्या एकूण टी-२० रेकॉर्डबद्दल बोलायचे झालं, तर त्याने २२४ विकेट्स घेतल्या आहेत. तर दोनदा ५ विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाजीतही कमाल टीम साउदीने फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. त्याने २०१ टी-२० मध्ये ८१४ धावा केल्या आहेत. त्यात २ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने ६० चौकार आणि ४६ षटकारही मारले आहेत. याशिवाय टीम साऊदीने ७९ कसोटीत ३१४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने १२ वेळा ५ आणि एकदा १० बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याने १४३ एकदिवसीय सामन्यांमध्ये १९० आणि ८३ टी-२० सामन्यांमध्ये ९९ विकेट्स घेतल्या आहेत.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3gwsZtm
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads