IPL 2021: पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला धोक्याचा इशारा, CSKचा हा फलंदाज फॉर्ममध्ये परतला - क्रिकेट प्रेमी

IPL 2021: पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला धोक्याचा इशारा, CSKचा हा फलंदाज फॉर्ममध्ये परतला

चेन्नई: आयपीएल २०२१चे दुसरे सत्र १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दुसऱ्या सत्रातील पहिली लढत विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. सध्या गुणतक्त्यात चेन्नई दुसऱ्या तर मुंबई चौथ्या स्थानावर आहे. या वर्षी चेन्नई संघाने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा आहेत. वाचा- आयपीएलचे दुसरे सत्र युएईमध्ये होणार असून यासाठी तेथे दाखल होणारा चेन्नई पहिला संघ ठरला आहे. संघातील खेळाडूंनी क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे. आता त्यांनी मैदानात जाऊन सराव देखील सुरू केलाय. या सरावातील एक व्हिडियो धोनीच्या चाहत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्याची जोरदार चर्चा होत आहे. वाचा- () ने गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पण त्याने आयपीएलमध्ये खेळणार असल्याचे म्हटले होते. गेल्या हंगामात धोनीला फार धावा करता आल्या नाहीत. या हंगामातील पहिल्या सत्रात धोनीच्या बॅटमधून फार काही धावा आल्या नाहीत. ७ सामन्यात त्याने फक्त ३७ धावा केल्या आहेत. वाचा- आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात मात्र धोनी नव्या लुक आणि उत्साहाने मैदानात उतरणार आहे. याची झलक त्याने सराव सत्रात दिली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडियोमध्ये धोनी गोलंदाजांना षटकार मारताना दिसत आहे. धोनीचा हा षटकार पाहून चाहत्यांना जुने दिवस आठवले. सराव सत्रातील धोनीची बॅटिंग पाहून याचा अंदाज येतो की तो मैदानावर उतरण्यास किती उत्सुक आहे. या व्हिडियोमध्ये धोनी दोन ते तीन चेंडूंवर षटकार मारताना दिसतोय. आता धोनीच्या चाहत्यांना हीच अपेक्षा असेल की आयपीएलमध्ये देखील धोनीने अशाच पद्धतीने फलंदाजी करावी.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/2WeKuqO
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads