विराट कोहलीला आयपीएल सुरु होण्यापूर्वीच मोठा धक्का, भारताचा महत्वाचा खेळाडू खेळू संघाबाहेर - क्रिकेट प्रेमी

विराट कोहलीला आयपीएल सुरु होण्यापूर्वीच मोठा धक्का, भारताचा महत्वाचा खेळाडू खेळू संघाबाहेर

नवी दिल्ली : विराट कोहलीला आता आयपीएल सुरु होण्यापूर्वी अजून एक मोठा धक्का बसला आहे. कारण कोहलीच्या आरसीबीमधील एक महत्वाचा खेळाडू आता संघाबाहेर गेला आहे. त्यामुळे त्याची उणीव आता आरसीबीला जाणवणार असून कोहलीची चिंता वाढेलली आहे. आरसीबीच्या संघातील भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला इंग्लंडमध्ये असताना दुखापत झाली होती. सराव करत असताना भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा चेंडू सुंदरला लागला होता आणि त्याच्या हाताला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे त्याला इंग्लंड दौऱ्यातून वगळण्यात आले होते. पण सुंदर अजूनही या दुखापतीमधून सावरलेला नाही. त्यामुळे तो आयपीएलमध्येही खेळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सुंदरसारखा महत्वाचा खेळाडू खेळणार नसल्यामुळे विराटची चिंता आता वाढेलली आहे. सुंदरच्या जागी आता बंगालकडून खेळणार आरसीबीचा नेट बॉलर आकाशदीप खेळणार असल्याचे समजत आहे. सुंदर खेळणार नसेल तर आरसीबीसाठी आता शाहबाज अहमदला जास्त संधी मिळणार असल्याचे दिसत आहे. पण सुंदरी संघातील जागा भरुन काढणे आरसीबीला कठीण जाईल. कारण सुंदर हा पॉवर प्लेमध्ये भेदक गोलंदजी करत होता. त्याचबरोबर सुंदर हा कोणत्याही स्थानावर येऊन धडाकेबाज फलंदाजीही करू शकत होता. पण आता सुंदर संघात नसल्यामुळे त्यांना एक चांगला अष्टपैलू खेळाडू शोधावा लागणार आहे.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/2UZi0RD
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads