मुंबई, चेन्नईनंतर आता आयपीएलमध्ये असू शकतात या दोन शहरांचे संघ, जाणून घ्या कोण आहे शर्यतीत... - क्रिकेट प्रेमी

मुंबई, चेन्नईनंतर आता आयपीएलमध्ये असू शकतात या दोन शहरांचे संघ, जाणून घ्या कोण आहे शर्यतीत...

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये आता दोन नवीन संघ येणार आहेत. पण हे दोन संघ कोणत्या शहरांचे असतील, याची उत्सुकता मात्र सर्वांना आहे. आयपीएलमध्ये मुंबई, चेन्नई, पंजाब... अशी संघांची नावं शहरांवरून आहेत. आयपीएलच्या शर्यतीत आता दोन शहरं आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. आयपीएलमध्ये आता कोणती दोन नवीन शहरांचे संघ असू शकतील, पाहा....आयपीएलमध्ये यापूर्वी पुणे, कोचीसारख्या शहरांचे काही संघ होते, पण आयपीएलमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळे या शहरांचे संघ आता नसतील. सध्याच्या घडीला आयपीएलमधील एक संघ घेण्यासाठी गौतम अदानी यांचा अदानी ग्रुप उत्सुक असून ते या शर्यतीत आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या गुजरातमध्ये क्रिकेटची चांगली प्रगती होत आहे, त्यामुळे आता नवीन आयपीएलमध्ये अहमदाबादचा संघ असू शकतो, असे दिसत आहे. अदानी ग्रुपबरोबरच कोलकाता येथील संजय गोएंका ग्रुप हा उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला अदानी आणि गोएंका हे दोन ग्रुप संघ घेण्याच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहेत. आयपीएलमध्ये कोलकाताचा संघ आहे. त्यामुळे आता गोएंका ग्रुप लखनौ या शहराचा संघ उतरवू शकतो, याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता पुढच्या वर्षीच्या आयपीएलमध्ये अहमदाबाद आणि लखनौ असे दोन नवीन संघ पाहायला मिळू शकतात, असे सध्याच्या घडीला तरी दिसत आहे. सध्याच्या घडीला भारतामध्ये क्रिकेटचा विकास ज्या शहरांमध्ये जास्त होत आहे, ती शहरं आता आयपीएलमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अदानी आणि गोएंका यांच्याबरोबर अजून दोन कंपन्या आयपीएलमधील संघ विकत घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये पहिली कंपनी हा हैदराबादमधील अरबिंदो फार्मा ही आयपीएलमध्ये संघ विकत घेण्यासाठी उत्सुक आहे. एकाबाजूला बीसीसीआय यंदाची आयपीएल युएईमध्ये यशस्वीरीत्या कशी आयोजित करता येईल, याचा विचार करत आहे. त्याचबरोबर दुसरीकडे पुढच्या आयपीएलमध्ये कोणते दोन नवीन संघ असतील, याचाही विचार सुरु झाला आहे. त्यामुळे लवकरच हे दोन नवीन संघ समोर येतील, अशी आशा आहे.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3yuUGcD
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads