IPL मध्ये सहभागी झालेल्या दोघांच्यात हणामारी? क्रिकेटपटू आणि... - क्रिकेट प्रेमी

IPL मध्ये सहभागी झालेल्या दोघांच्यात हणामारी? क्रिकेटपटू आणि...

नवी दिल्ली: आयपीएलचा १४वा हंगाम स्थगित झाल्यानंतर परदेशी खेळाडू मायदेशाला जाण्यासाठी रवाना झालेत. ऑस्ट्रेलियाने भारतातून येण्यास बंदी घातल्याने हे खेळाडू मालदीव येथे काही दिवस क्वारंटाइन राहून मग ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर तसेच आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा आणि समालोचक मायकल स्लेटर या दोघांच्यात हणामारी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. दोघांमध्ये नशेत असताना मारहाण केल्याचे समजते. वाचा- डेली टेलीग्राफने दिलेल्या वृत्तानुसार मालदीवच्या ताज कोरल रिसॉर्टमध्ये क्वांरटाइनच्या कालावधीत या दोघांमध्ये वाद झाला. रात्री उशिरा यांनी मारहाण झाली. वॉर्नर आणि स्लेटर यांनी अशा प्रकारची कोणतीही घटना झाली नसल्याचे म्हटले आहे. फॉक्सस्पोर्ट्स कॉम एयूशी बोलताना स्लेटर म्हणाला, अशा प्रकारचे वृत्त चुकीचे आहे. डेव्ही आणि मी खुप चांगले मित्र आहोत.आमच्यात अशा प्रकारची कोणतीही घटना होण्याची शक्यताच नाही. वाचा- वॉर्नर म्हणाला, असे काहीच झाले नाही. मला कळत नाही की तुम्हाला अशा गोष्टी कोठून मिळतात. तुम्ही येथे उपस्थितीत नाही आणि ठोस सक्षिदार देखील नाही, तेव्हा तुम्ही असे कसे काय लिहू शकता. आयपीएल स्थगित झाल्यानंतर स्पर्धे सहभागी झालेले ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, कोच आणि अन्य सदस्य मिळून ३९ जणांना गुरुवारी चार्टर्ड विमानाने मालदीव आणले गेले. ही सर्व व्यवस्था भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने केली आहे. आयपीएल स्थगित होण्याआधीच स्लेटर अन्य ऑस्ट्रेलियन लोकांच्या आधी मालदीवमध्ये आला होता. ऑस्ट्रेलियाने १५ मे पर्यंत भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने भारतातून येणाऱ्या व्यक्तीवर तुरुंगवास आणि दंड करण्याची धमी दिली होती तेव्हा स्लेटरने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यावर टीका केली होती.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3esNkiG
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads