IPL स्थगित, पण विराट कोहलीने केलाय हा लाजिरवाणा विक्रम - क्रिकेट प्रेमी

IPL स्थगित, पण विराट कोहलीने केलाय हा लाजिरवाणा विक्रम

मुंबई: बायो बबलमध्ये खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला करोना व्हायरसची लागण झाल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने आयपीएलचा १४वा हंगाम स्थगित केला. या स्पर्धेतील ३१ लढती अद्याप शिल्लक आहेत. याबाबत बीसीसीआयने अद्याप काहीही सांगितले नाही. वाचा- आयपीएलच्या १४व्या हंगामात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघाने या वर्षी चांगली कामगिरी केली होती. स्वत: विराटच्या नावावर या स्पर्धेतील यशस्वी फलंदाज अशा विक्रम आहे. विराटने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. या वर्षी त्याने ६ हजार धावांचा टप्पा पार केला आणि अशी कामगिरी करणारा तो पहिली फलंदाज ठरला. या शिवाय अन्य काही विक्रम देखील विराटच्या नावावर आहेत. वाचा- निधन अशाच एका विक्रममध्ये एक लाजिरवाणा विक्रम देखील विराटच्या नावावर आहे. पराभूत झालेल्या सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट पहिल्या स्थानावर आहे. विराटच्या उपस्थितीत या स्पर्धेत आरसीबीने सर्वाधिक सामने गमावले आहेत आणि याच सामन्यात विराटने सर्वाधिक धावा केल्या आहेत. वाचा- विराटने आयपीएलमध्ये ६ हजार धावा केल्या आहेत. त्यापैकी २ हजार ८०२ धावा पराभव झालेल्या सामन्यात केला आहेत. संघाचा पराभव झालेल्या सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट अव्वल स्थानी आहे. त्यानंतर शिखर धवनचा क्रमाक येतो, त्याने २ हजार २२५ धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर, चौथ्या स्थानावर रॉबिन उथप्पा, पाचव्या स्थानावर एबी डिव्हिलियर्स आहे. वाचा- वॉर्नरने २ हजार २१८, उथप्पाने २ हजार २०५ तर एबीने १ हजार ९९३ धावा केल्या आहेत. वाचा-


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3hdUUzy
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads