IPL : न्यूझीलंडचे आयपीएलमधील खेळाडू मायदेशी जाणार नाहीत, मालदिवमधून या देशात घेणार एंट्री - क्रिकेट प्रेमी

IPL : न्यूझीलंडचे आयपीएलमधील खेळाडू मायदेशी जाणार नाहीत, मालदिवमधून या देशात घेणार एंट्री

नवी दिल्ली : आयपीएल स्थगित झाल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंना न्यूझीलंडने प्रवेश नाकारला होता. त्यामुळे न्यूझीलंडच्या खेळाडूंनी मालदिव या देशाचा आसरा घेतला होता. मालदिवमधून हे खेळाडू आपल्या मायदेशी परततील, असे वाटत होते. पण आता असे होणरा नाही. कारण आता मालदिवमधून न्यूझीलंडचे खेळाडू आपल्या मायदेशी जाणार नाहीत, तर अन्य एका देशात ते आता एंट्री घेणार असल्याचे समोर आले आहे. न्यूझीलंडचे आयपीएलमधील खेळाडू आता मालदिवहून थेट इंग्लंडला जाणार असल्याचे समजते आहे. न्यूझीलंडच्या संघाचे फिजिओ टॉकी सिमसेक यांनी ही माहिती दिली आहे. आयपीएलमधील केन विल्यमसन, कायले जेमिन्सनसारखे आयपीएलमधील खेळाडू आता इंग्लंडला येत्या ४-५ दिवसांत रवाना होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. टॉकी यांनी यावेळी सांगितले की, " न्यूझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये दोन कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर भारताबरोबर त्यांचा विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना होणार आहे. इंग्लंडमध्ये मालदिव या देशाला रेड लिस्टमध्ये टाकले आहे. त्यामुळे न्यूझीलंडचे खेळाडू जेव्हा इंग्लंडमध्ये पोहोचतील तेव्हा त्यांना १० दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. त्यानंतर त्यांना सराव करण्याची मुभा देण्यात येणार आहे." न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यामध्ये २ जून पासून कसोटी मालिका होणार आहे. यामध्ये दोन्ही संघ दोन कसोटी सामने खेळणार आहेत. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ भारताबरोबर विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना खेळणार आहे. त्यामुळे जर न्यूझीलंडच्या खेळाडूंना २ जूनला सामना खेळायचा असेल तर त्यासाठी त्यांना त्यापूर्वी ४-५ दिवस सराव करावा लागेल. त्यामुळे न्यूझीलंडचे मालदिवमधील खेळाडू हे १५-१७ मे या कालावधीमध्ये इंग्लंडला रवाना होण्यासाठी जाऊ शकतात. त्यानंतर त्यांना १० दिवस क्वारंटाइन व्हावे लागेल आणि त्यांना करोना चाचणीही द्यावी लागेल. या सर्व गोष्टी झाल्यानंतरच त्यांना बायो बबलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. पण यासाठी न्यूझीलंडचे खेळाडू कोरना चाचणीत निगेटीव्ह यायला हवेत. त्यामुळे न्यूझीलंडच्या खेळाडूंना मालदिवहून थेट इंग्लंडला जावे लागणार आहे.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3tH4KfJ
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads