IPL : वेस्ट इंडिजने प्रवेश नाकारल्यावर ख्रिस गेलने घेतला या देशाचा आसरा, व्हिडीओ झाला व्हायरल... - क्रिकेट प्रेमी

IPL : वेस्ट इंडिजने प्रवेश नाकारल्यावर ख्रिस गेलने घेतला या देशाचा आसरा, व्हिडीओ झाला व्हायरल...

नवी दिल्ली : आयपीएल स्थगित झाली असली तरी धडाकेबाज क्रिकेटपटू ख्रिस गेलला वेस्ट इंडिजने मात्र प्रवेश नाकारला आहे. त्यामुळेच गेलला आता एका देशाचा आसरा घ्यावा लागला आहे. गेल क्वारंटाइनमध्ये असला तरी त्याची मजा सुरु आहे. गेलचा एक व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. वेस्ट इंडिजने भारतामधून येणाऱ्या विमानांवर १५ मेपर्यंत बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेलला आता आपल्या देशात जाता आलेले नाही. त्यामुळे गेलने सध्याच्या घडीला मालदिवचा आसरा घेतला आहे. गेल हा मालदिवमध्ये क्वारंटाइन असला तरी त्याची मजा मात्र सुरु आहे. कारण गेलने मालदिवमध्येही एक व्हिडीओ बनवला असून त्याने आपल्या इंस्टाग्रामवर तो पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल हा सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी पोस्ट करत असल्याचे पाहायला मिळते. गेलने यावेळी एक खास व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे. यावेळी गेल हा एक बर्गर खाताना दिसत आहे. आतापर्यंत एवढा मोठा बर्गर आपण पाहिला नसल्याचे गेलने सांगितले आहे. पहिल्यांदाच मी एवढा मोठा बर्गर खात आहे, असे गेल या व्हिडीओमध्ये म्हणत असल्याचे पाहायला मिळाले आहे. हा बर्गर फारच मोठा आहे आणि मी त्याला आता माझ्या घरी घेऊन जाणार आहे, असे गेलने या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. आयपीएलच्या पूर्वीही गेलचे काही व्हिडीओ चांगलेच गाजले होते. आयपीएलमध्येही गेलची बॅट चांगलीच तळपली होती. त्यामुळेच गेलने चाहत्यांना यावेळीही खूष केले होते. त्यामुळेच गेल नेमका काय करतो, हे पाहण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. करोनामुळे आयपीएल स्थगित करण्यात आले आणि काही परदेशी खेळाडूंना त्याच्या देशात पाठवण्यात आले आहे. पण काही खेळाडूंना अजूनही प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे ज्या खेळाडूंना आता प्रवेश नाकारण्यात आला आहे, त्यांना आता मालदिवमध्ये ठेवण्यात आले आहे. हे खेळाडू येथे क्वारंटाइन होतील आणि त्यानंतर १५ मेनंतर आपल्या मायदेशी परततणार आहेत.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/2Radv4Q
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads