IPL 2021 : मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांना श्रीलंकेने नाकारले, या देशाचा घेतलाय आसरा - क्रिकेट प्रेमी

IPL 2021 : मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांना श्रीलंकेने नाकारले, या देशाचा घेतलाय आसरा

नवी दिल्ली : आयपीएल स्थगित झाल्यावर सर्व खेळाडू आपल्या घरी पोहोचले आहेत. पण मुंबई इंडियन्यचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांना त्यांच्याच श्रीलंकेने नाकारले आहे. त्यामुळे आता जयवर्धने यांनी श्रीलंकेपासून लांब असलेल्या एका देशाचा आसरा घेतला आहे. एकिकडे श्रीलंका ही आयपीएलचे उर्वरीत सामने आयोजित करायला सज्ज असल्याचे दिसत आहे, पण दुसरीकडे त्यांनी भारतामधून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. त्यामुळे भारतामधून कोणतीही व्यक्ती श्रीलंकेत सध्याच्या घडीला जाऊ शकत नाही. त्यामुळे जयवर्धने यांना श्रीलंकेमध्ये परतता आलेले नाही. त्यामुळेच जयवर्धने यांना अजून एका देशाचा आसरा घ्यायला लागला आहे. मुंबई इंडियन्सचे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सध्याच्या घडीला मालदिव या बेटावर आहे. त्यामुळे जयवर्धने यांनाही मालदिव या बेटावरच ठेवण्यात आले आहे. सध्याच्या घडीला जयवर्धने हे क्वारंटाइनमध्ये आहेत. पण श्रीलंकेत ते कधी परतणार, याबाबत मात्र कोणतीही माहिती अद्याप पुढे आलेली नाही. कारण मालदिवमध्ये क्वारंटाइनचा अवधी संपल्यावर जयवर्धने यांना श्रीलंका आपल्या देशात प्रवेश देणार का, ही गोष्ट अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे जयवर्धने हे श्रीलंकेत कधी जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. जयवर्धने यांच्याबरोबरच मुंबई इंडियन्सच्या संघातील काही खेळाडू असे आहेत की, त्यांना अजूनही आपल्या घरी पोहोचता आलेले नाही. त्यामुळे हे खेळाडू जोपर्यंत घरी जाऊ शकणार नाहीत. तोपर्यंत मुंबई इंडियन्सला चिंता असेल. मुंबई इंडियन्सने आपल्या सर्व खेळाडूंची घरी पोहोचण्याची खासगी विमानाने व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर परेदशी खेळाडूंसाठीही त्यांनी खास विमानांची सोय केली होती. ऑस्ट्रेलियाने आयपीएलमधील खेळाडूंना आपल्या देशात प्रवेश बंदी केली आहे. आता १५ मेपर्यंत आयपीएलच्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियामध्ये पाय ठेवता येणार नाही. त्याचबरोबर हा कालावधी जर वाढवण्यात आला तर मुंबई इंडियन्सच्या संघातील ख्रिस लीन आणि नॅथन कल्टर नाइल या दोन ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे काय होणार, ही चिंता मुंबई इंडियन्सच्या संघाला असेल. ऑस्ट्रेलियाचे ३८ खेळाडू, पंच, प्रशिक्षक, सामनाधिकारी हे सर्व जण आता मालदिव या देशात राहिले आहेत. काही दिवस त्यांना मालदिवचा आसरा घेतला आहे. पण जर ऑस्ट्रेलियाने विमानबंदीची मदत वाढवली तर या सर्वांचे नेमके काय होणार, हा सर्वात मोठा प्रश्न असेल. कारण आतापर्यंत बाकीच्या देशातील सर्व खेळाडू आतापर्यंत आपल्या मायदेशी परतत आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची चिंता सर्वांना असेल. त्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या दोन खेळाडूंचाही समावेश आहे.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3hcFlrF
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads