IPL 2021 : गूड न्यूज...आयपीएलमधल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना घरी जाण्याची संमती मिळाली, पण ही आहे चिंता... - क्रिकेट प्रेमी

IPL 2021 : गूड न्यूज...आयपीएलमधल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना घरी जाण्याची संमती मिळाली, पण ही आहे चिंता...

मुंबई : आयपीएलमधल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. कारण आता ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आपल्या मायदेशी परतात येणार आहे. कारण आता ऑस्ट्रेलियाच्या सरकारने आयपीएलमधील खेळाडूंना मायदेशी परतण्याची मुभा दिली आहे. आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाचे एकूण १४ खेळाडू होते, त्याचबरोबर प्रशिक्षक, पंच, सामनाधिकारी आणि समालोचक असे मिळून ३८ जण भारतामध्ये दाखल झाले होते. पण ऑस्ट्रेलियाच्या सरकारने त्यांना प्रवेश नाकारला होता. पण आता खास विमानाने हे सर्वजण आपल्या मायदेशी परतणार आहेत. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने आयपीएलसाठी भारतात गेलेल्या सर्व जणांना प्रवेश बंदी केली होती. ही प्रवेशबंदी १५मेपर्यंत होती. त्यामुळे आता १६ मे या दिवशी खासगी विमानाने ऑस्ट्रेलियाच्या या सर्व व्यक्ती मायदेशी रवाना होणार आहेत. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या अहवालानुसार, ऑस्ट्रेलियाच्या सर्व व्यक्तींसाठी आता एक खास योजना बनवली जात आहे. यामध्ये आयपीएलसाठी भारतात आलेल्या ३८ लोकांसाठी १६ मे या दिवशी एका खास विमानाचे आयजोन करण्यात आले आहे. हे विमान मालदिवहून थेट सिडनीला जाणार आहे. त्याचबरोबर सिडनीला पोहोचल्यावर सर्व जणांना १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. पण अजूनपर्यंत बीसीसीआयला अधिकृतपणे या गोष्टीची माहिती मिळालेली नाही. त्यामुळे बीसीसीआय थोडीशी चिंतेत आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना मायदेशात जाण्याची अनुमती मिळेल, असे सध्याच्या घडीला दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट मंडळ, ऑस्ट्रेलियामधील क्रिकेटर्स संघ आणि बीसीसीआय यांना अजूनही ऑस्ट्रेलियाच्या सरकारने अजूनही याबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही. पण ही गोष्ट ऑस्ट्रेलियाचे सरकार करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जोपर्यंत या गोष्टीची अधिकृत माहिती मिळत नाही, तोपर्यंत चाहत्यांच्या मनातही धाकधुक असेल. ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी असेल. कारण काही दिवसांनी ऑस्ट्रेलियामध्ये प्रतिष्ठीत अॅशेस मालिकेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियासाठी सर्वात महत्वाची असणार आहे. त्यामुळे आता खेळाडूंना प्रवेश मिळाला तर त्यांना या मालिकेसाठी चांगला सराव करता येणार आहे.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3odGbpz
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads