IPL 2021 : आयपीएलबाबत समोर आली ही फेक न्यूज, विश्वास ठेवू नका आणि काय आहे सत्य जाणून घ्या... - क्रिकेट प्रेमी

IPL 2021 : आयपीएलबाबत समोर आली ही फेक न्यूज, विश्वास ठेवू नका आणि काय आहे सत्य जाणून घ्या...

नवी दिल्ली : आयपीएल कधी आणि कसं होणार, याबाबत आता बऱ्याच चर्चा सुरु आहेत. पण त्यामध्येच आयपीएलच्या आयोजनाबाबत एक फेक न्यूज आल्याचे दिसत आहे. या गोष्टीवर विश्वास ठेवू नका आणि काय आहे सत्य हे पूर्णपणे जाणून घ्या... बीसीसीआय आयपीएलचे उर्वरित ३१ सामने सप्टेंबर महिन्यात इंग्लंडमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहे आणि त्यांची इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाबरोबर चर्चा झाली आहे, असे म्हटले जात होते. त्यानंतर एक पत्रक क्रिकेट विश्वात चांगलेच व्हायरल झाले आहे. या पत्रकानुसार इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने ही गोष्ट मान्य केली असून त्यांनी काही अटीही बीसीसीायपुढे ठेवल्या आहेत. या पत्रकामध्ये इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने आयपीएल सप्टेंबर महिन्यात खेळवण्याची परवानगी दिली आहे, त्यासाठी भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना आयपीएलनंतर खेळवण्यात येणात असल्याचे मान्य केले आहे. त्याबरोबर बीसीसीआयला आपल्या खेळाडूंना १०० या क्रिकेट लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी, अशी अट टाकलेली आहे. या आशयाचे एक पत्र क्रिकेट विश्वात व्हायरल झालेले आहे. पण या पत्रकाबाबत इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने कोणताही दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी या पत्रकावर कोणत्याही चाहत्यांनी विश्वास ठेऊ नये, असेच म्हटले जात आहे. खरी गोष्ट नेमकी काय आहे, जाणून घ्या...आयपीएलमधील लढती खेळवण्यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत आहे. ही स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत भारतात होणार नाही असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याआधीच स्पष्ट केले होते. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर मिळणाऱ्या वेळेत आयपीएलच्या लढती खेळवण्याचा विचार असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून येत होते. अशात बीसीसीआयने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला कसोटी मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्याची विनंती केल्याचे वृत्त आले होते. या वृत्तावर इंग्लंड बोर्डाने उत्तर दिले आहे. बीसीसीआयने कसोटी मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्याची कोणत्याही प्रकारची अधिकृत विनंती केली नसल्याचे इसीबीने म्हटले आहे. ब्रिटिश मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने चार ऑगस्टपासून सुरू होणारी मालिका एक आठवडा आधी सुरू करण्याची विनंती केल्याचे म्हटले होते. यामुळे आयपीएलचा हंगाम आयोजित करण्यास वेळ मिळेल. पण आता इसीबीने स्पष्ट केले आहे की, नियोजित कार्यक्रमानुसार या मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. कारण भारताकडून आतापर्यंत वेळापत्रकात बदल करण्याची विनंती करण्यात आलेली नाही.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/2QIUVkc
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads