IPL 2021 : डेव्हिड वॉर्नरवर केलेल्या कडक कारवाईवर सुनील गावस्कर भडकले, म्हणाले... - क्रिकेट प्रेमी

IPL 2021 : डेव्हिड वॉर्नरवर केलेल्या कडक कारवाईवर सुनील गावस्कर भडकले, म्हणाले...

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा धमाकेदार सलामीवीर डेव्हिड वॉर्नरवर आयपीएलमध्ये खेळत असताना कडक कारवाई करण्यात आली होती. या कारवाईवर भारताचे माजी कर्णधार आणि समाचोलक सुनील गावस्कर चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले आहेत. वॉर्नरला यावर्षीच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघाने कर्णधारपदावरून हटवले होते. वॉर्नरकडून कर्णधारपद काढून ते न्यूझीलंडच्या केन विल्यम्सनला देण्यात आले होते. पण त्याचबरोबर वॉर्नरला संघातून बाहेर काढण्याचा निर्णयही यावेळी घेतला गेला होता. या निर्णयावर गावस्कर चांगलेच भडकलेले पाहायला मिळत आहेत. गावस्कर याबाबत म्हणाले की, " हैदराबादच्या संघाला आता विचार करण्यासाठी थोडा वेळ मिळेल की, त्यांनी फक्त वॉर्नरकडून कर्णधारपद काढून घेतले नाही तर त्यालाही संघाबाहेर केले आहे. वॉर्नर नक्कीच धावा करत होता. पूर्वीसारखा तो आक्रमक फलंदाजी करत नसला तरी तो एक मौल्यवान खेळाडू आहे. त्यामुळे जेव्हा वॉर्नरला संघाबाहेर करण्यात आले तेव्हा मला धक्का बसला होता. जर वॉर्नरकडे कर्णधार नसले तरी तो एक चांगला फलंदाज आहे. त्यामुळे त्याला संघात कायम ठेवायला हवे होते, असे मला वाटते. वॉर्नरला कर्णधारपदावरून काढणे योग्य होते की अयोग्य याबाबत बऱ्याच कालावधीनंतरही चर्चा होतच राहील. पण त्याला संघात कायम ठेवायला हवे होते, असे मला वाटते." गावस्कर यांनी पुढे सांगितले की, " जर कामगिरी चांगली होत नसेल तर एक प्रश्न उपस्थित राहतो, तो म्हणजे फक्त कर्णधारालाच का आपल्या पदावरून हटवण्यात आले आहे, प्रशिक्षकांना का त्यांच्या स्थानावर कायम ठेवण्यात आले आहे. जर फुटबॉलमध्ये जर एखादा संघ चांगली कामगिरी करत नाही तर पहिल्यांदा प्रशिक्षकाला काढले जाते. पण मग क्रिकेटमध्ये ही गोष्ट होताना का दिसत नाही." आयपीएल सध्याच्या घडीला अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत २९ सामने खेळवण्यात आले आहेत, पण ३१ सामने अजूनही बाकी आहेत. त्यामुळे हे उर्वरीत बाकी सामने कधी होणार, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. उर्वरीत सामने सप्टेंबर महिन्यात खेळण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/2Qd1dbm
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads