IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या संघात कायरन पोलार्डची नेमकी कशी झाली एंट्री, या खेळाडूने सुचवले नाव - क्रिकेट प्रेमी

IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या संघात कायरन पोलार्डची नेमकी कशी झाली एंट्री, या खेळाडूने सुचवले नाव

मुंबई : मुंबई इंडियन्ससाठी धडाकेबाज फलंदाज कायरन पोलार्ड हा आतापर्यंत बऱ्याचवेळा मॅचविनर ठरला आहे. पण पोलार्ड हा मुंबई इंडियन्सच्या संघात नेमका आला तरी कसा, ही गोष्ट आता समोर आली आहे. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्होने आता ही गोष्ट सर्वांना सांगितली आहे. ब्राव्हो हा २००८ आणि २०१० साली मुंबई इंडियन्सच्या संघात होता. त्यानंतर ब्राव्हो हा चेन्नई सुपर किंग्सच्या संघात दाखल झाला आणि आतापर्यंत तो याच संघात आहे. त्यावेळी एका खेळाडूने पोलार्डचे नाव मुंबई इंडियन्सच्या संघाला सुचवले आणि त्यानंतर पोलार्डची मुंबई इंडियन्सच्या संघात एंट्री झाल्याचे पाहायला मिळाले. याबाबत ब्राव्होने क्रिकबझला एका मुलाखतीमध्ये सांगितले की, " मी जेव्हा मुंबई इंडियन्सच्या संघातून बाहेर पडलो तेव्हा ते एका अष्टपैलू खेळाडूच्या शोधात होते. त्यावेळी मी त्यांना पोलार्डचे नाव सुचवले होते. त्यावेळी मी पोलार्डबरोबर संवाद साधला होता. पोलार्ड त्यावेळी एका क्लबसाठी क्रिकेट खेळत होता. त्यामुळे मी त्यानंतर ड्वेन स्मिथचे नाव मुंबई इंडियन्सला सुचवले आणि त्यांनी स्मिथला संधी दिला होती." ब्राव्होने त्यानंतर सांगितले की, " त्यानंतर पुढच्याच वर्षी चॅम्पियन्स लीगमध्ये माझी मुंबई इंडियन्सच्या राहुल संघवीबरोबर चर्चा झाली होती. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, पोलार्डदेखील इथेच आहे, त्यामुळे त्याच्याकडे जा आणि स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच त्याच्याबरोबर करार करा. त्यानंतर जेव्हा पोलार्डला करार मिळाला तेव्हा त्याला यावर विश्वासच बसला नव्हता. कारण त्यावेळी पोलार्डला दोन लाख अमेरिकन डॉलरचा करार देण्यात आला होता." मुंबई इंडियन्सच्या संघात पोलार्ड अजूनही खेळत आहे. यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये पोलार्डने धमाकेदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे यापुढेही पोलार्ड मुंबई इंडियन्सच्या संघात कायम राहील, असेच दिसत आहे. त्यामुळे पोलार्डची निवड मुंबई इंडियन्ससाठी योग्य ठरल्याचेच सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलार्ड हा मुंबई इंडियन्सच्या संघाचा एक अविभाज्य भाग असल्याचेच पाहायला मिळत आहे.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3fj2pT2
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads